मैत्री, त्याचं लग्न, दोघांत वाद अन्‌ निर्घृण हत्या... १७ वर्षीय वैष्णवीच्या मारेकऱ्याला ४ तासांत अटक!, वाळूज पोलिसांची कामगिरी, मुरमीत घडले होते कौर्य

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुरमी येथे १७ वर्षीय वैष्णवी संतोष निळ या मुलीची हत्या करणाऱ्या संशयित तरुणाला अवघ्या ४ तासांत पोलिसांनी जेरबंद करण्यात यश मिळवले. त्याला न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दोघांत मैत्री होती, यातून वाद होत असल्याचे तपासात समोर येत आहे. मारेकऱ्याने कोणताही पुरावा ठेवला नसताना अत्यंत कमी काळात पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला, हे विशेष.

nana

नानासाहेब कडूबा मोरे (वय २७, रा. मुरमी) असे संशयिताचे नाव आहे. वैष्णवी वाळूजच्या साईनाथ महाविद्यालयात १२ वीत शिकत होती. ती रोज सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंत कॉलेजला जात होती. ती वडील संतोष, आई मथुरा, आजोबा यादवराव आणि लहान भावासह राहण्यास होती. नीळ दाम्‍पत्‍य बटाईने शेती करते. संतोष हे इसारवाडी रोडवरील एच. पी. पेट्रोलपंपाजवळ पानटपरीसुद्धा चालवितात. शुक्रवारी नेहमीप्रमाणे सकाळी साडेसहाला ती कॉलेजसाठी घराबाहेर पडली. दुपारी महाविद्यालयातून वैष्णवी घरी आल्यानंतर एकटीच होती. ही संधी साधून नानासाहेबने वैष्णवीला गाठले आणि विळ्याने गळ्यावर वार करून तिची हत्या केली. घटनेवेळी तिचे वडील संतोष त्यांच्या पानपटरीवर गेले होते. लहान भाऊ शाळेत गेला होता. आई मथुरा बटाईने केलेल्या मुरमी येथील शेतात कामाला गेली होती.

मैत्री, लग्नानंतर वाद...
सूत्रांच्या माहितीनुसार, वैष्णवी आणि नानासाहेबमध्ये आधी मैत्री होती. काही महिन्यांपूर्वी नानासाहेबचे लग्न झाले. यातून दोघांत वाद होत होते. घटनेवेळीही त्यांच्यात वाद झाला आणि त्याने थेट तिची हत्या केली. दुपारी तिच्या वडिलांना वैष्णवी खाटेजवळ उजव्या कुशीवर रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेली दिसली. त्यांनी लगेचच पत्नीला कॉल करून शेतातून बोलावून घेतले. गावातील लोकांनी पोलिसांना कॉल केल्याने ते लगेचच घटनास्‍थळी धावले. फॉरेन्सिक टीम आणि श्वान टिपूलाही घटनास्‍थळी पाचारण केले होते. घटनास्‍थळी पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, सहायक पोलीस आयुक्त भागीरथी पवार, वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जगन्नाथ मेनकुदळे यांनी सहकाऱ्यांनी भेट दिली होती.

पहाटे साडेतीनला आवळल्या मुसक्या
वैष्णवीची हत्या केल्यानंतर नानासाहेबने पळ काढला होता. वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे यांना व विशेष पथकाच्या अंमलदारांना योग्य त्या सूचना केल्या. त्यानुसार विशेष पथकाच्या अधिकाऱ्यांनी तपासाची चक्रे फिरवून बोलेगाव (ता. गंगापूर) येथून नानासाहेबला आज, २० डिसेंबरला पहाटे साडेतीनला ताब्यात घेतले. कसून चौकशीत त्याने गुन्हा कबूल केला. अधिक तपास पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे करत आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, सहायक पोलीस आयुक्त श्रीमती डॉ. भागीरथी पवार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे, रमेश राठोड, प्रविण वाघ, पोलीस अंमलदार संदीप धनेधर, विजय पिंपळे, सुधाकर पाटील, नितीन धुळे, श्रीकांत सपकाळ, बजरंग धाडगे, शेख गफ्फार, पांडुरंग शेळके, अमोल गायकवाड, नितीन देशमुख, धनंजय सानप, पोलीस मित्र किशोर गाडेकर, अमन शेख यांनी पार पाडली. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software