- News
- Uncategorized
- छत्रपती संभाजीनगर भाजप महिला मोर्चाची कार्यकारिणी बरखास्त होणार!; दोन पदाधिकाऱ्यांच्या ‘फ्रीस्टाईल’म...
छत्रपती संभाजीनगर भाजप महिला मोर्चाची कार्यकारिणी बरखास्त होणार!; दोन पदाधिकाऱ्यांच्या ‘फ्रीस्टाईल’मुळे मोठा निर्णय होणार
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : भाजप महिला मोर्चाच्या २ पदाधिकाऱ्यांनी एकमेकींच्या झिंज्या उपटल्यानंतर हे प्रकरण पक्षाच्या वरिष्ठांनी खूपच गांभीर्याने घेतले आहे. बुधवारी (३१ जुलै) दुपारी आयएमए हॉलच्या प्रांगणात ही फ्रीस्टाईल हाणामारी झाली होती. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली असून, येत्या आठवड्यात महिला मोर्चाची पूर्ण शहर कार्यकारिणीच बरखास्त करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाच्या […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : भाजप महिला मोर्चाच्या २ पदाधिकाऱ्यांनी एकमेकींच्या झिंज्या उपटल्यानंतर हे प्रकरण पक्षाच्या वरिष्ठांनी खूपच गांभीर्याने घेतले आहे. बुधवारी (३१ जुलै) दुपारी आयएमए हॉलच्या प्रांगणात ही फ्रीस्टाईल हाणामारी झाली होती. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली असून, येत्या आठवड्यात महिला मोर्चाची पूर्ण शहर कार्यकारिणीच बरखास्त करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली.
सध्या भाजपकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. यानिमित्ताने राज्य विस्तारकांचा वर्ग आयएमए हॉलमध्ये राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, संघटनमंत्री रघुनाथ कुलकर्णी, विभागीय संघटन मंत्री संजय कौडगे यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. राज्यातील १४० विस्तारक उपस्थित होते. भाजप महिला मोर्चाच्या शहर सरचिटणीस महिलेने शहराध्यक्षांनी आपल्याकडून अडीच लाख रुपये हातउसणे घेतल्याचे सांगून त्या आता आपला फोन उचलत नसल्याची तक्रार प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे केली. तेवढ्यात शहराध्यक्षा तिथे आल्या.
बावनकुळे यांनी दोघींचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर हॉलमधून परतत असताना शहराध्यक्षांनी सरचिटणीस महिलेला पकडले आणि मारहाण केली. दोघींकडून जोरदार शिवीगाळ करत हाणामारी झाली. अन्य महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांचे भांडण सोडले. यात एकीच्या चेहऱ्यावर तर दुसरीच्या हाताला जखमा झाल्या आहेत. हा प्रकार बावनकुळे यांना कळताच त्यांनी जालिंदर शेंडगे यांना दोघींकडे पाठविले. मात्र तोपर्यंत दोन्ही गट क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. शेंडगे आणि हर्षवर्धन कराड यांनी सगळा प्रकार काय आहे, हे समजून घेऊन वरिष्ठांना सांगण्यात येईल, त्यानंतर कारवाईचा निर्णय होईल, असे सांगत दोघींची समजूत काढली. त्यामुळे पोलिसांत तक्रारी दाखल झाल्या नाहीत.

