खळबळजनक… छत्रपती संभाजीनगरातील २० जणांना २ कोटींचा गंडा घालून ब्रोकर परागंदा!; गोल्डर सिटी सेंटरमधील अलिशान कार्यालय, घराला लॉक लावून पसार झाल्याने गुंतवणूकदारांना धक्का…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : स्टॉक एक्स्चेंज कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका ब्रोकरने शहरातील १५ ते २० लोकांना तब्‍बल १ ते २ कोटींना गंडा घातला आहे. सिडकोतील गोल्डन सिटी सेंटरमधील कार्यालय बंद करून तो पसार झाला असून, घरीही लॉक आहे. कष्टाची जमापुंजी जास्त हव्यासापायी गमावल्याने गुंतवणूकदारांना धक्का बसला आहे. या प्रकरणात […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : स्टॉक एक्स्चेंज कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका ब्रोकरने शहरातील १५ ते २० लोकांना तब्‍बल १ ते २ कोटींना गंडा घातला आहे. सिडकोतील गोल्डन सिटी सेंटरमधील कार्यालय बंद करून तो पसार झाला असून, घरीही लॉक आहे. कष्टाची जमापुंजी जास्त हव्यासापायी गमावल्याने गुंतवणूकदारांना धक्का बसला आहे. या प्रकरणात एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या तक्रारीवरून सिडको एमआयडीसी पोलिसांनी ब्रोकरसह त्‍याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात सेवानिवृत्त शिक्षक हेमंत रंगनाथ जगताप (वय ७३, रा. मुक्तानंद देवळाई परिसर नाईकनगर, बीड बायपास छत्रपती संभाजीनगर) यांनी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ते दिवाणदेवडीतील मराठा माध्यामिक हायस्कूलमध्ये शिक्षक होते. मार्च २०१० मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांनी नोकरी करताना पगारातून काही रक्कम बचत करून ठेवली होती. सेवानिवृत्तीनंतरही त्यांना काही रक्कम भेटली होती.

त्यांचा नातेवाइक व कॉलनीत राहणारा अनिल रावसाहेब तांगडे (रा. नाईकनगर बीड बायपास) याने जगताप यांना सांगितले की, माझा मित्र राहुल राजेंद्र काबरा (रा. एन ४ सिडको छत्रपती संभाजीनगर) हा Zerodha या स्टॉक एक्स्चेंज कंपनीशी निगडीत स्किममध्ये व इतर व्यवसायात गुंतवणूक करतो. त्याच्याकडे गुंतवणूक केल्यास तो गुंतवणूक रकमेवर चांगला परतावा देतो. राहुल काबरा याचे सिडकोतील गोल्डन सिटी सेंटरमध्ये कार्यालय आहे. त्याच्याकडे जवळपास १० ते १५ लोकांनी पैसे गुंतवले आहेत. त्यांना प्रत्येक महिन्याला त्यांच्या गुंतवणूक रकमेवर २ ते ६ टक्‍क्‍यांपर्यंत फिक्स इंट्रेस्ट मिळत आहे, असे आमिषही तांगडे याने दाखले.

तांगडे नातेवाइक असल्याने जगताप यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून एप्रिल २०२१ मध्ये तांगडे याच्यासह जाऊन राहुल काबराची त्याच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. जगताप यांनी दोघांवर विश्वास ठेवून सुरुवातीला २ लाख रुपये गुंतवणूक केली. त्‍या रकमेवर त्‍याने नियमित परतावा दिल्याने तांगडे यांनी दावरवाडी (ता. पैठण) येथील ६ एकर शेती विकून आणखी ३ लाख रुपये राहुल काबराकडे तांगडे याच्या सांगण्यावरून गुंतवले. त्‍यानंतर तांगडे याने आणखी परताव्याचे आमिष दाखवून आणखी ५ लाख रुपये गुंतवायला सांगितले. एकूण १० लाख रुपये गुंतवल्यानंतर काही दिवसच जुलै २०२३ पर्यंत काबराने परतावा दिला. मात्र नंतर परतावा देणे बंद केले. त्‍यामुळे जगताप यांनी तांगडे याला विचारणा केली. त्यानंतर तांगडेसोबत ते काबराच्या कार्यालयाकडे गेले असता कार्यालय बंद होते. त्याचा फोनही बंद येत होता. तो त्याचे घर सोडूनही गेला होता.

१५ ते २० लोकांना १ ते २ कोटींचा गंडा…
फसवणूक झाल्याचे जगताप यांच्या लक्षात आल्यानंतर त्‍यांनी आधी पोलीस आयुक्‍तांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलीस आयुक्‍तांच्या आदेशानुसार या प्रकरणात सिडको एमआयडीसी पोलिसांनी राहुल काबरा आणि अनिल तांगडे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. केवळ जगताप यांचीच नव्हे तर त्यांचा मुलगा अभिजीतचीही १० लाख रुपये आणि अन्य १५ ते २० लोकांची अंदाजे १ ते २ कोटी रुपयांची फसवणूक करून काबरा पसार झाल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक जगन्नाथ मेनकुदळे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software