राजेंद्र जंजाळ-मंत्री शिरसाटांतील तणाव शिगेला!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरच्या शिंदे गटात सध्या वर्चस्ववाद सुरू आहे. जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ आणि मंत्री संजय शिरसाट यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. थेट जंजाळांना हटवून माजी महापौर त्र्यंबक तुपे यांना जिल्हाप्रमुख करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, त्यामुळे वाद अधिकच भडकला आहे. जंजाळांना उत्तर देण्यासाठी तुपे यांना पुढे करण्यात आल्याचे चित्र आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सुरू असलेल्या आरोप-प्रत्‍यारोपामुळे शिंदे गट भाजपच्या तुलनेत तयारीत मागे ढकलला गेला आहे.

महापालिका निवडणुकीमुळे ठाकरे गटातून अनेक ‘रथी-महारथी’ शिंदे गटात दाखल झाले. त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेच्या आड जंजाळ येऊ शकतात हे हेरून त्यांनी आधीच जंजाळ यांना बाजूला करण्यासाठी मोठी फिल्डिंग लावली आहे. मंत्री संजय शिरसाट आणि जंजाळ यांच्यात वाद निर्माण करण्याचा त्यांचा डाव जवळपास आता यशस्वी झाला आहे. खा. श्रीकांत शिंदे यांनी जंजाळ व शिरसाट यांच्यातील वादावर नगरपालिका निवडणुकीनंतर तोडगा काढणार असल्याचे म्हटले होते. मात्र निवडणूक होऊनही वरिष्ठ स्तरावर या वादावर काहीही चर्चा होताना दिसत नाही. त्यातच आता तुपे यांना जिल्हाप्रमुख करण्याचा घाट रचण्यात आल्याची चर्चा सुरू झाल्याने वादाच्या आगीत तेल ओतले गेले आहे. जंजाळ हे भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू असली तरी त्यांनी मात्र आपण शिंदे गटातच राहणार असल्याचे निःक्षून सांगितले आहे.

तुपे-जंजाळांत आरोप-प्रत्यारोप
त्र्यंबक तुपे यांना जिल्हाप्रमुख करणार असल्याच्या चर्चेवर जंजाळ म्हणाले, की तुपे फुलंब्रीचे संपर्कप्रमुख असतानाच तेथील नगराध्यक्षपदाचा उमेदवार आणि तीन नगरसेवक भाजपमध्ये गेले. त्यांच्या या ‘कर्तृत्ववान' कामामुळेच कदाचित पालकमंत्री शिरसाट त्यांना जिल्हाध्यक्ष बनवतील. पालकमंत्री मालक आहेत आणि कुणालाही जिल्हाध्यक्ष बनवू शकतात. त्यांना त्र्यंबक तुपे यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, की आनंदा ढोके यांना जंजाळ यांनीच पक्षात आणले होते. सागर लॉनमध्ये जंजाळ यांनीच त्यांना नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर केले होते. ढोकेंना शिवसेना तालुकाप्रमुख करण्याचे आश्वासन त्यांनीच दिले होते. मी दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेत आलो आहे. त्यामुळे माझा फुलंब्रीचा संपर्क कमी होता. त्यामुळे जंजाळ यांनीच त्यांना भाजपत पाठवले, असा माझा आरोप आहे. माझ्या बदनामीचे त्यांचे हे कटकारस्थान असावे, अशी मला शंका आहे, असे तुपे म्हणाले. 

अजित पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गाडेकर ठाकरे गटात दाखल
अजित पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी सहकाऱ्यांसह शुक्रवारी (५ डिसेंबर) मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. करंजखेड जिल्हा परिषद गटाची उमेदवारी माजी आमदार नितीन पाटील यांचे पूत्र अर्जुन पाटील यांना जिल्हाध्यक्ष आ. सतीश चव्हाण यांनी जाहीर केल्याने गाडेकर नाराज होते. गाडेकर यांनी करंजखेड जि.प. गटातून निवडणूक लढविण्याची तयारी चालविली होती. मात्र काही दिवसांपूर्वी करंजखेड येथे झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमात सतीश चव्हाण यांनी पक्षाचे उमेदवार म्हणून अर्जुन पाटील यांचे नाव जाहीर केले होते. तेव्हापासून गाडेकर हे पक्ष सोडणार असल्याची चर्चा होती. त्यांच्या ठाकरे गटात पक्षप्रवेशावेळी अंबादास दानवे उपस्थित होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कर्जबाजारी शेतकऱ्याने विहिरीत घेतली जलसमाधी!; कन्नड तालुक्यातील हृदयद्रावक घटना

Latest News

कर्जबाजारी शेतकऱ्याने विहिरीत घेतली जलसमाधी!; कन्नड तालुक्यातील हृदयद्रावक घटना कर्जबाजारी शेतकऱ्याने विहिरीत घेतली जलसमाधी!; कन्नड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कन्नड तालुक्यातील नेवपूर येथील परमेश्वर गणपत खेळवणे (वय ५१) या शेतकऱ्याने स्वतःच्या विहिरीत उडी घेऊन...
हाताच्या असह्य वेदनांवर संमोहनशास्त्राची फुंकर, नांदेडकर यांच्या कार्यशाळेची काय आहे किमया..., असे अनेक लोक जे रोगी बनून आले, योगी बनून गेले...
गोरक्षकांनी केंब्रीज चौकात पकडला गोवंशाचे मांस घेऊन जाणारा ॲपेरिक्षा
हर्सूल टी पॉइंटवर हिट ॲन्ड रन; दुचाकीस्वाराला उडवून कार पसार... 
भाडेकरूने केला घरमालकिनीचा विश्वासघात, नवनाथनगरात काय घडलं...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software