- News
- राज्य-राष्ट्र स्पेशल
- ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे अन् ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी मंगेश ससाणेंसह ५ जण बसले उपोष...
ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे अन् ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी मंगेश ससाणेंसह ५ जण बसले उपोषणाला!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
मराठे २०२४ ला वाट लावून टाकतील : जरांगेमनोज जरांगे केवळ भाजपला टार्गेट करताहेत : ससाणे जालना (सीएससीएन वृत्तसेवा) : जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे उपोषणाला बसले असताना, आता याच गावात ओबीसींनीही आरक्षण वाचविण्यासाठी उपोषण सुरू केले आहे. गावातील सोनियानगर वस्तीत मंगेश ससाणे आणि ५ जणांनी आज, १८ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण सुरू […]
मराठे २०२४ ला वाट लावून टाकतील : जरांगे
मनोज जरांगे केवळ भाजपला टार्गेट करताहेत : ससाणे
मनोज जरांगे यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. तुम्ही आरक्षण नाही दिले नाही तर तुमचे बारा-तेरा वाजवून टाकेल. मराठे २०२४ ला तुमची वाट लावून टाकतील. विधानसभा निवडणुकीत पाडापाडी झाली तर बोंबलू नका, असे थेट आव्हान त्यांनी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी आज, १८ सप्टेंबरला पत्रकारांशी बोलताना दिले. तुम्ही मराठ्यांना मूर्ख समजता का? आम्हाला काही मर्यादा आहेत. वर्षभर तुम्हाला मदत आणि सहकार्य केले. तरीही तुम्ही सहकार्यच करा म्हणत असाल तर कोणते सरकार तुम्ही चालवता आणि कशाला चालवता, असा सवाल जरांगे यांनी केला. आचारसंहिता लागण्याच्या आत मागण्या मान्य करा, असे जरांगे म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, की फडणवीसांनी पापाच्या पारड्यात बसू नये. दोन-चार दिवसांत आमचा विषय संपवा. नाहीतर नंतर आमच्या नावाने ओरडत बसू नका. सध्या कोणावर बोलणार नाही पण नंतर सगळ्यांचाच हिशेब करतो, असे जरांगे म्हणाले. देवेंद्र फडणवीस राज्याचा सर्व कारभार पाहत असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला.
मंगेश ससाणे यांनीही सरकारला इशारा दिला आहे. सरकारने एकाला जावई करू नये. सत्तेत तीन पक्ष असताना मनोज जरांगे केवळ भाजपला टार्गेट करत आहेत. त्यांच्या मागण्यांना विरोध म्हणून आमचे उपोषण सुरू केले आहे. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनीही जरांगेंच्या उपोषणाला प्रत्युत्तर म्हणून अंतरवाली सराटीत उपोषणाचा निर्णय घेतला होता. मात्र अंतरवाली सराटीकडे येत असताना वडीगोद्रीत पोलिसांनी अडवून त्यांना परतवून लावले होते. मात्र आज गनिमी काव्याने मंगेश ससाणे आणि त्यांचे सहकारी अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले. सगळे अधिकारी मंत्री अंतरवाली सराटीत येतात. त्यामुळेच आम्हीही अंतरवाली सराटीत बसलो, असे ते म्हणाले. बोगस कुणबी दाखले रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. वडीगोद्रीतच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचेही दुसरे उपोषण सुरू होणार आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
By City News Desk
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
By City News Desk
Latest News
11 Mar 2026 22:08:14
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...

