- News
- राज्य-राष्ट्र स्पेशल
- आगामी विधानसभा निवडणुकीच्या मतदान केंद्रासाठी, गृहनिर्माण सोसायटी अध्यक्ष व सचिवांचा सहभाग
आगामी विधानसभा निवडणुकीच्या मतदान केंद्रासाठी, गृहनिर्माण सोसायटी अध्यक्ष व सचिवांचा सहभाग
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
आगामी विधानसभा निवडणुकीच्या मतदान केंद्रासाठी, गृहनिर्माण सोसायटी अध्यक्ष व सचिवांचा सहभाग. मतदारांच्या निवासाजवळ मतदान केंद्र उपलब्ध होण्यासाठी गृहनिर्माण संस्थांनीपुढाकार घेण्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे आवाहन मुंबई (सीएससीएन वृत्तसेवा ) : आगामी काळात होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने दूसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम, 2024 घोषित केला आहे. या पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत आयोगाने शहरातील […]
आगामी विधानसभा निवडणुकीच्या मतदान केंद्रासाठी, गृहनिर्माण सोसायटी अध्यक्ष व सचिवांचा सहभाग. मतदारांच्या निवासाजवळ मतदान केंद्र उपलब्ध होण्यासाठी गृहनिर्माण संस्थांनीपुढाकार घेण्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे आवाहन
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या 22 ऑगस्ट, 2012 च्या परिपत्रकानुसार सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष व सचिव यांना मतदार याद्यांच्या पुनरीक्षण कार्यक्रमासाठी ‘मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक’ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक यांनी त्यांच्या गृहनिर्माण संस्थेतील मतदार नोंदणीस पात्र होणारे रहिवासी, सोसायटीतील जागा सोडून गेलेल्या व्यक्ती व मयत व्यक्ती यांची यादी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांना पुरवावी. त्याचप्रमाणे सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांनी सोसायटीतील रहिवाशांना मतदार नोंदणी व दुरुस्ती करुन घेण्याबाबत आवाहन करावे.
गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या गृहनिर्माण संस्थेत मतदान केंद्र सुरु करण्याकरिता आपल्या गृहनिर्माण संस्थंचे नाव, पत्ता, नोंदणी क्रमांक, अंदाजित मतदार संख्या इत्यादी माहितीसह आपल्या क्षेत्रातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) / मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. तसेच Online अर्ज भरण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या http://ceo.maharashtra.gov.in या संकेत स्थळावरील https://forms.gle/twLTGpjzzy2x9eV36 व https://forms.gle/z261Ah4DDgQxSEvs9 या गुगल लिंकवर आपला अर्ज भरु शकतील.
मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम, 2024 (दुसरा) या राष्ट्रीय महत्वाच्या कार्यक्रमामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांचे सहकार्य अपेक्षित आहे. रहिवाशांसाठी निवासाच्या जवळ आणि सोयीच्या ठिकाणी मतदान केंद्र उपलब्ध होण्याच्या दृष्टीने, गृहनिर्माण संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात येत आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
हर्सूल टी पॉइंटवर हिट ॲन्ड रन; दुचाकीस्वाराला उडवून कार पसार...
By City News Desk
भाडेकरूने केला घरमालकिनीचा विश्वासघात, नवनाथनगरात काय घडलं...
By City News Desk
राजेंद्र जंजाळ-मंत्री शिरसाटांतील तणाव शिगेला!
By City News Desk
सेंट्रल नाक्यावर नायलॉन मांजाने चिरला ३ वर्षीय चिमुकल्याचा गळा!
By City News Desk
राजनगरमध्ये मध्यरात्री हल्लकल्लोळ! टवाळखोराने जाळल्या ५ दुचाकी!!
By City News Desk
हर्सूल टी पॉइंटवर हिट ॲन्ड रन; दुचाकीस्वाराला उडवून कार पसार...
By City News Desk
कामगाराचे कपडे काढून ठेकेदाराकडून अमानुष मारहाण!, वाळूज पंढरपुरातील घटना
By City News Desk
Latest News
07 Dec 2025 13:38:41
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गोरक्षकांनी गोवंशाचे मांस घेऊन जाणारा ॲपेरिक्षा पकडून सिडको एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिला. ही घटना...

