Political : छत्रपती संभाजीनगरात अशोक चव्हाण X संजय राऊत आमनेसामने!; दोघांच्या वक्‍तव्‍यांनी राजकारण तापले…, काँग्रेसचे मराठवाडा नेतृत्त्व अमित देशमुखांकडे

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : भाजपच्या बैठकीसाठी खा. अशोकराव चव्हाण आणि विदर्भाच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे खा. संजय राऊत मंगळवारी (१३ ऑगस्ट) शहरात आले होते. यावेळी दोघांनी केलेल्या वक्‍तव्‍यांमुळे राजकारण चांगलेच तापले! महायुती सरकारने जाहीर केलेल्या योजना बहिणींसाठी नसून मते विकत घेण्यासाठी असल्याचा आरोप राऊत यांनी केला तर, राऊत हे तात्‍पुरती […]

छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : भाजपच्या बैठकीसाठी खा. अशोकराव चव्हाण आणि विदर्भाच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे खा. संजय राऊत मंगळवारी (१३ ऑगस्ट) शहरात आले होते. यावेळी दोघांनी केलेल्या वक्‍तव्‍यांमुळे राजकारण चांगलेच तापले! महायुती सरकारने जाहीर केलेल्या योजना बहिणींसाठी नसून मते विकत घेण्यासाठी असल्याचा आरोप राऊत यांनी केला तर, राऊत हे तात्‍पुरती करमणूक आहेत. महायुतीचे सरकार पुन्हा आले तरच लाडकी बहीण योजनेसह इतर योजना टिकतील असा प्रचार-प्रसार भाजपा कार्यकर्त्यांनी जनतेत जाऊन करावा, असे आवाहन चव्हाण यांनी केले.

आयएमए हॉलमध्ये भाजपची बैठक
भाजपाचे राज्यसभा खा. अशोकराव चव्हाण यांनी आयएमए हॉलमध्ये पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्श केले. यावेळी ते म्हणाले, की महायुती सरकारच्या योजना यशस्वी होतील याची विरोधकांना भीती वाटते. त्यामुळे ते बिनबुडाचे आरोप करत आहेत. शासनाने मराठा आरक्षणासाठी काय केले हे सांगण्यात कमी पडलो. १० टक्के आरक्षण मिळाले. उच्चशिक्षणासाठी त्याचा लाभ सुरू झाला आहे. ज्यांच्याकडे कुणबी रेकॉर्ड आहे. त्यांना प्रमाणपत्र मिळत आहेत. भाजपा, शिंदेसेना, पवार गट आम्ही तिघे एकत्र असून तिघांनी योजनांचे श्रेय घेणे काही चुकीचे नाही. सरकारच्या योजना लोकांपर्यंत सांगा, असे आवाहन त्‍यांनी केले. सरचिटणीस दीपक ढाकणे यांनी प्रास्ताविक केले. खा. डॉ. भागवत कराड, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, लक्ष्मीकांत थेटे, भगवान घडमोडे, अनिल मकरिये, जालिंदर शेंडगे, मनीषा मुंडे यांची उपस्थिती होती. खा. संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेवर केलेल्या टीकेबद्दल चव्हाण म्हणाले, की राऊत हे तात्पुरती करमणूक आहेत. मात्र यामुळे त्‍यांना मते मिळणार नाहीत.

संजय राऊत यांची लाडकी बहीण योजनेवर टीका
राज्य सरकारने आणलेल्या योजना या बहिणींसाठी नसून विधानसभा निवडणुकीत मते विकत घेण्यासाठी असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी छत्रपती संभाजीनगरात पत्रकारांशी बोलताना केला. आमदार रवी राणा यांनी मते न दिल्यास लाडक्या बहीण योजनेचे पैसे परत घेतले जातील, असे विधान केले. ही त्यांची खरी मानसिकता आहे. पैसे का त्यांच्या बापजाद्यांचे आहेत? हे पैसे लाडक्या बहिणींच्या हक्काचे आहेत. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येणार आहे. आमचे सरकार आल्यावर या योजनेच्या रकमेत वाढ करू. योजनांविषयी यांचा हेतू चांगला नाही. यामुळे बारामतीमध्ये लाडक्या बहिणींनी अजितदादांना आधीच पराभूत केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांतील गद्दार दिसणार नाहीत, असेही राऊत म्हणाले. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंपेक्षा चांगला चेहरा आहे का, असेल तर काँग्रेसने दाखवावा, असा टोलाही त्‍यांनी काँग्रेसला लगावला.

मराठवाड्यासाठी काँग्रेसकडून अमित देशमुखांचे नेतृत्त्व पुढे…
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळे मराठवाड्यातून आता नवे नेतृत्त्व पुन्हा अमित देशमुख यांना पुढे आणण्याचे प्रयत्‍न काँग्रेसकडून केले जात आहे. अमित देशमुख आधी केवळ लातूरपुरते मर्यादित राहिले होते. आता त्‍यांना मराठवाडास्तरावर नेतृत्त्व करण्याची संधी मिळत आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मराठवाड्यात काँग्रेसची धुरा अमित देशमुख सांभाळतील, असे सोमवारी (१२ ऑगस्ट) जाहीर करून त्‍यांच्या नेतृत्त्वावर शिक्कामोर्तब केले आहे. पटोले यांच्या घोषणेनंतर टाळ्यांचा कडकडाट बरेच काही सांगून गेला. हात जोडून अमित देशमुख यांनी ही नवी जबाबदारी स्वीकारली आहे. मराठवाड्यातील ४६ पैकी २५ जागा आपल्याकडे घ्या, आम्ही निवडून आणून दाखवू, असे अमित देशमुख यांनी सांगितले तेव्हा पटोले म्हणाले, की २५ काय त्याहून अधिक जागा सोडवून घेऊ.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software