CSCN वृत्तावर ठाकरे गटाच्या पहिल्या यादीने शिक्‍कामोर्तब!; सुरेश बनकर, उदयसिंह राजपूत, किशनचंद तनवाणी, राजू शिंदे, दिनेश परदेशींना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर, पहिल्या यादीत ६५ जण

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर सिटी न्‍यूजने चार दिवसांपूर्वी दिलेली बातमी तंतोतंत खरी ठरली आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने सिल्लोड मतदारसंघातून सुरेश बनकर, कन्‍नडमधून उदयसिंह राजपूत, छत्रपती संभाजीनगर मध्यमधून किशनचंद तनवाणी, पश्चिममधून राजू शिंदे, वैजापूरमधून दिनेश परदेशी यांना उमेदवारी निश्चित झाल्याची बातमी दिली होती, ती आज, २३ ऑक्‍टोबरला प्रत्‍यक्षात उतरली. उद्धव ठाकरे यांनी […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर सिटी न्‍यूजने चार दिवसांपूर्वी दिलेली बातमी तंतोतंत खरी ठरली आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने सिल्लोड मतदारसंघातून सुरेश बनकर, कन्‍नडमधून उदयसिंह राजपूत, छत्रपती संभाजीनगर मध्यमधून किशनचंद तनवाणी, पश्चिममधून राजू शिंदे, वैजापूरमधून दिनेश परदेशी यांना उमेदवारी निश्चित झाल्याची बातमी दिली होती, ती आज, २३ ऑक्‍टोबरला प्रत्‍यक्षात उतरली. उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत ६५ जण असून, त्‍यात छत्रपती संभाजीनगरची हे पाचही जण आहेत. भाजपातून आलेल्यांना थेट तिकिटे देण्यात आल्याने निष्ठावंतांच्या संतापाला दुर्लक्षित करण्यात आल्याचे दिसून येते.

भाजप, शिंदे गट, अजित पवार गटाप्रमाणे ठाकरे गटानेही विद्यमानांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ घातली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपातून वैजापूरचे डॉ. दिनेश परदेशी ठाकरे गटात आले. सिल्लोडमध्ये सुरेश बनकरही भाजपातून ठाकरे गटात आले. या दोघांआधी छत्रपती संभाजीनगर पश्चिममध्ये राजू शिंदे हे ठाकरे गटात आले होते. किशनचंद तनवाणी हेही आधी भाजपातच होते. या चौघांची उमेदवारी घोषित झाल्याची बातमी छत्रपती संभाजीनगर सिटी न्‍यूजने दिल्यानंतर निष्ठावंतांत संतापाची लाट उसळली होती. त्‍यातील काही जण थेट मुंबईला जाऊन ‘मातोश्री’वर धडकले होते. मात्र त्‍यांच्या संतापाला फारसे महत्त्व न देता ठरवल्याप्रमाणे चौघांनाही उमेदवारी देण्यात आली. कन्‍नडचे विद्यमान आमदार उदयसिंह राजपूत यांच्यापुढे शिंदे गटाकडून कोणता उमेदवार केला जातो, हे बघणे आता उत्‍सुकतेचे ठरत आहे. पाचही ठिकाणी शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी सरळ लढत होणार असून, शिवसैनिकांत होणारी घमासान लढाई पहायला मिळणार आहे. कठीण काळात सोबत राहिलेल्या आमदार नितीन देशमुख, उदयसिंह राजपूत, रमेश कोरगावकर, सुनील प्रभू, ऋतुजा लटके, संजय पोतनीस, आदित्य ठाकरे, कैलास पाटील, भास्कर जाधव, राजन साळवी, वैभव नाईक यांना ठाकरेंनी पुन्हा संधी दिली आहे.

ठाकरे गटाची पहिल्या यादीतील उमेदवार….
वरळी- आदित्य ठाकरे
सिल्लोड- सुरेश बनकर
कन्नड- उदयसिंह राजपूत
संभाजीनगर मध्य – किशनचंद तनवाणी
संभाजीनगर पश्चिम- राजू शिंदे
वैजापूर- दिनेश परदेशी
कोपरी – पाचपाखाडी – केदार दिघे
मेहकर- सिद्धार्थ खरात
उन्मेष पाटील- चाळीसगाव
पाचोरा- वैशाली सूर्यवंशी
बाळापूर- नितीन देशमुख
अकोला पूर्व- गोपाल दातकर
वाशिम- सिद्धार्थ देवळे
बडनेरा- सुनिल खराटे
रामटेक- विशाल वरबटे
वणी- संजय दरेकर
लोहा- एकनाथ पवार
कळमनुरी- डॉ. संतोष टारफे
परभणी- डॉ. राहुल पाटील
गंगाखेड- विशाल कदम
नांदगाव- गणेश धात्रक
मालेगाव बाह्य- अद्वय हिरे
निफाड- अनिल कदम
नाशिक मध्य- वसंत गीते
नाशिक पश्चिम- सुधाकर बडगुजर
पालघर- जयेंद्र दुबळा
बोईसर- डॉ.विश्वास वळवी
भिवंडी ग्रामीण – महादेव घाटळ
अंबरनाथ – राजेश वानखेडे
डोंबिवली – दिपेश म्हात्रे
कल्याण ग्रामीण – सुभाष भोईर
ओवळा – माजिवडा – नरेश मणेरा
ठाणे – राजन विचारे
ऐरोली – एम. के. मढवी
मागाठाणे – उदेश पाटेकर
विक्रोळी – सुनील राऊत
भांडुप पश्चिम – रमेश कोरगावकर
जोगेश्वरी पूर्व – अनंत नर
दिंडोशी – सुनील प्रभू
गोरेगाव – समीर देसाई
अंधेरी पूर्व – ऋतुजा लटके
चेंबूर- प्रकाश फातर्पेकर
कुर्ला- प्रविणा मोरजकर
कलीना- संजय पोतनीस
वांद्रे पूर्व- वरुण सरदेसाई
माहिम- महेश सावंत
कर्जत- नितीन सावंत
उरण- मनोहर भोईर
महाड- स्नेहल जगताप
नेवासा- शंकरराव गडाख
गेवराई- बदामराव पंडित
धारशिव- कैलास पाटील
परांडा- राहुल पाटील
बार्शी- दिलीप सोपल
सोलापूर दक्षिण- अमर पाटील
सांगोले- दिपक साळुंखे
पाटण- हर्षद कदम
दापोली- संजय कदम
गुहागर- भास्कर जाधव
रत्नागिरी- सुरेंद्रनाथ माने
राजापूर- राजन साळवी
कुडाळ- वैभव नाईक
सावंतवाडी- राजन तेली
राधानगरी- के.पी.पाटील
शाहुवाडी- सत्यजीत आबा पाटील

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software