ॲड. आंबेडकर राबवताहेत भाजपचा राजकीय अजेंडा; शरद पवार गटाचा आरोप, छ. संभाजीनगरात पत्रकार परिषद

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर भाजपचा राजकीय अजेंडा राबवत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी छत्रपती संभाजीनगरात पत्रकार परिषद घेऊन केला. ओबीसींचे आरक्षण गेले नसताना ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढून कोणाचा बचाव केला जात आहे, असा सवालही त्यांनी केला. या वेळी प्रदेश सरचिटणीस […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर भाजपचा राजकीय अजेंडा राबवत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी छत्रपती संभाजीनगरात पत्रकार परिषद घेऊन केला. ओबीसींचे आरक्षण गेले नसताना ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढून कोणाचा बचाव केला जात आहे, असा सवालही त्यांनी केला.

या वेळी प्रदेश सरचिटणीस माजी आमदार जयदेव गायकवाड यांनीही ॲड. आंबेडकर यांच्यावर तोंडसुख घेतले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे सामाजिक क्षेत्रात कार्यरत विविध पदाधिकारी, संघटनांसोबत समर्थनगरातील महात्मा गांधी भवनात बुधवारी बैठक घेण्यात झाली. त्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, अर्थतज्ञ प्रा. एच. एम. देसरडा, सुधाकर सोनवणे यांची उपस्थिती होती. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मागील पाच वर्षांमध्ये केलेल्या विविध विधानांचे लवकरच पुस्तक काढणार आहे. त्याविषयीची संपूर्ण माहिती गोळा केली जात असल्याचेही प्रवक्ते लवांडे यांनी या वेळी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software