३ खून, राजरोस सशस्‍त्र हल्ले, चोऱ्या, हाणामाऱ्या… थांबवा हो!, खैरेंच्या नेतृत्त्वात ठाकरे गटाचे पोलीस आयुक्‍तांना साकडे, ७ दिवसांची दिली डेडलाइन, ८ व्या दिवशी शिवसैनिक उचलणार हे पाऊल…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली असून, आठच दिवसांत ३ हत्‍या घडल्या. चाकू, तलवारी काढून सर्रास टोळक्‍यांकडून हत्‍या, हल्ले केले जात आहेत. प्रत्येक कॉलनीत अवैध दारू अड्डे राजरोस सुरू आहेत. गुंडगिरी आणि नशेखोरांवर सात दिवसांत कडक कारवाई करा अन्यथा आठव्या दिवशी मध्यरात्री पोलीस आयुक्तालयावर मशाल मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा शिवसेनेच्या […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली असून, आठच दिवसांत ३ हत्‍या घडल्या. चाकू, तलवारी काढून सर्रास टोळक्‍यांकडून हत्‍या, हल्ले केले जात आहेत. प्रत्येक कॉलनीत अवैध दारू अड्डे राजरोस सुरू आहेत. गुंडगिरी आणि नशेखोरांवर सात दिवसांत कडक कारवाई करा अन्यथा आठव्या दिवशी मध्यरात्री पोलीस आयुक्तालयावर मशाल मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा शिवसेनेच्या ठाकरे गटाने पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना दिला आहे.

माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (७ डिसेंबर) शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना निवेदन दिले. अर्धा तास चर्चा केली. हत्‍या, हल्ल्यांमुळे शहरातील नागरिकांत दहशत पसरली आहे. खुलेआम चाकू, सुरे घेऊन टोळकी फिरतात. नशेखोरांचे अड्डे ठिकठिकाणी निर्माण झाले आहेत. एटीएम फोडी, महिला अत्याचार, घरफोडीच्या घटनाही वाढल्या आहेत. अवैध दारू अड्डे, गांजा विक्री आणि नशेच्या गोळ्या, औषधींची विक्रीही जोरात सुरू आहे.

नशेखोरांमुळेच शहरात गुन्हेगारी असून, यामुळे शहराची बदनामी होत आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलावीत, अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी सहसंपर्कप्रमुख त्र्यंबक तुपे, महानगरप्रमुख राजू वैद्य, माजी महापौर नंदकुमार घोडेले, सुदाम सोनवणे, महिला आघाडीच्या सुनीता आऊलवार, आशा दातार, दुर्गा भाटी, नलिनी बाहेती, सुनीता औताडे, महानगरसंघटक सुकन्या भोसले, मीरा देशपांडे, शिवअंगणवाडी सेनेच्या रेणुका जोशी, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, बाळासाहेब थोरात, ज्ञानेश्वर डांगे, हरिभाऊ हिवाळे, विधानसभा संघटक दिग्विजय शेरखाने, उपजिल्हाप्रमुख श्रीरंग आमटे पाटील, हिरालाल सलामपुरे, किशोर कच्छवाह, राजू इंगळे, विजय वाघमारे, संतोष खेंडके, अ‍ॅड. चंद्रकांत गवई, माजी नगरसेवक मकरंद कुलकर्णी, सचिन खैरे, सुभाष शेजवळ, उपशहरप्रमुख राजेंद्र दानवे, अनिल जैस्वाल, संदेश कवडे, जयसिंग होलिये, संजय हरणे, कान्हुलाल चक्रनारायण, प्रमोद ठेंगडे, प्रितेश उर्फ बंटी जैस्वाल, शेख रब्बानी, नारायण जाधव, दिनेशराजे भोसले, नंदू लबडे, विष्णू कापसे, किरण गणोरे, दिनेश तिवारी, नाथा वखरे महिला आघाडीच्या उपशहरसंघटक प्रतिभा राजपूत, सुचिता आंबेकर, अ‍ॅड. अंजना गवई, लता संकपाल, रुपाली मुंदडा आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software