- Marathi News
- पॉलिटिक्स
- शिंदे गटाचे उमेदवार अब्दुल सत्तार ६ कोटी ८५ लाखांच्या मालमत्तेचे धनी; ६ गुन्हेही अंगावर
शिंदे गटाचे उमेदवार अब्दुल सत्तार ६ कोटी ८५ लाखांच्या मालमत्तेचे धनी; ६ गुन्हेही अंगावर
On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र
सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : शिंदे गटाचे सिल्लोडचे उमेदवार अब्दुल सत्तार यांनी बुधवारी (२३ ऑक्टोबर) एक उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला. या अर्जासोबत त्यांनी स्वतःच्या मालमत्तेचा तपशील दिला असून, त्यानुसार त्यांच्याकडे एकूण ६ कोटी ८५ लाख २७ हजार ६०१ रुपयांची मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे. बीए फर्स्ट इयरपर्यंत शिकलेल्या सत्तारांविरुद्ध एकूण ६ गुन्हे दाखल […]
सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : शिंदे गटाचे सिल्लोडचे उमेदवार अब्दुल सत्तार यांनी बुधवारी (२३ ऑक्टोबर) एक उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला. या अर्जासोबत त्यांनी स्वतःच्या मालमत्तेचा तपशील दिला असून, त्यानुसार त्यांच्याकडे एकूण ६ कोटी ८५ लाख २७ हजार ६०१ रुपयांची मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे. बीए फर्स्ट इयरपर्यंत शिकलेल्या सत्तारांविरुद्ध एकूण ६ गुन्हे दाखल आहेत.
-५ कोटी ४३ हजार ६५१ रुपयांची जंगम मालमत्ता. १ कोटी ८४ लाख ८३ हजार ९५० रुपयांची स्थावर मालमत्ता.
-सत्तार यांच्या पत्नीच्या नावे ३ कोटी ९७ लाख २९ हजार ९३६ रुपयांची जंगम मालमत्ता. ४० लाख ६ हजार ७४० रुपयांची स्थावर मालमत्ता.
-सत्तार यांच्याकडे ३ लाख २० हजार रुपयांची शासकीय देणी असून, ३९ लाख ४९ हजार ३० रुपयांचे बँकेकडून कर्ज घेतले आहे.
-विविध बँकांमध्ये ६२ लाख २९ हजार ५७० रुपयांच्या ठेवी.
-१५ तोळे सोने असून, ७ लाख ९१ हजार ५८३ रुपयांचे हिरे.
-महिंद्रा इंटरप्राइजेस कंपनीत १२ लाख ५० हजार रुपयांचे, तर विविध सहकारी संस्थांमध्ये २६ हजार ७०५ रुपयांचे, एएस अजंता कन्स्ट्रक्शनमध्ये २ कोटी ५५ लाख ९२ हजार ८०१ रुपयांचे शेअर्स आहेत.
-एक इनोव्हा कार आहे.
-२०२३-२४ चे एकूण उत्पन्न ९४ लाख ९५ हजार ४५६ रुपये.
सिल्लोड : शिंदे गट -अब्दुल सत्तार, अपक्ष- रफीक खा मनवर खा पठाण व लक्ष्मण गणपत दांडगे.
छत्रपती संभाजीनगर पूर्व : अपक्ष -शेख खाजा किस्मतवाला कासीम, मो. इसाक मो. यासिन
गंगापूर : अपक्ष- शिवाजी खुबे, गोरख इंगळे
दोन दिवसांत ३४३ उमेदवारांनी अर्ज नेले…
९ मतदारसंघांतून दोन दिवसांत ३४३ उमेदवारांनी अर्ज नेले असून, यात भाजप, शिंदे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गटाच्या उमेदवारांसाठी घेतलेल्या अर्जांचा समावेश आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
आयआरसीटीसीच्या कन्फर्म तिकिटात नाव बदलायचे कसे?
By City News Desk
पैठण येथून युवक बेपत्ता, माहिती कळविण्याचे आवाहन
By City News Desk
हर्सूल टी पॉइंटजवळ जुगार अड्ड्यावर छापा, ६ जुगारी पकडले
By City News Desk
Latest News
12 Nov 2025 20:31:11
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील केमिकल टेक्नॉलॉजी विभागात एम. फार्मसी अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांसाठी...
