- News
- पॉलिटिक्स
- विधानसभा निवडणूक : आता लक्ष माघारीकडे..!; ८ मतदारसंघांत दुहेरी तर ‘मध्य’मध्ये तिहेरी कुस्ती!
विधानसभा निवडणूक : आता लक्ष माघारीकडे..!; ८ मतदारसंघांत दुहेरी तर ‘मध्य’मध्ये तिहेरी कुस्ती!
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज, २९ ऑक्टोबरला शेवटचा दिवस होता. उद्या, ३० ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल. त्यानंतर ४ नोव्हेंबरपर्यंत ज्या उमेदवारांना माघार घ्यायची आहे, त्यांना अर्ज मागे घेता येईल. त्यानंतरच प्रत्यक्षात मैदानात कोण कुणाच्याविरोधात उभे ठाकेल, हे कळणार आहे. जिल्ह्यात कुठे दुहेरी तर कुठे तिहेरी लढत होणार असल्याचे सध्याचे […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज, २९ ऑक्टोबरला शेवटचा दिवस होता. उद्या, ३० ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल. त्यानंतर ४ नोव्हेंबरपर्यंत ज्या उमेदवारांना माघार घ्यायची आहे, त्यांना अर्ज मागे घेता येईल. त्यानंतरच प्रत्यक्षात मैदानात कोण कुणाच्याविरोधात उभे ठाकेल, हे कळणार आहे. जिल्ह्यात कुठे दुहेरी तर कुठे तिहेरी लढत होणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. पैठण, वैजापूर, कन्नड, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर मध्य, पश्चिममध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या शिवसैनिकांत तुल्यबळ लढत होणार आहे. गंगापूरमध्ये भाजप- शरद पवार गट, छत्रपती संभाजीनगर पूर्वमध्ये भाजप-एमआयएम तर फुलंब्रीत भाजप-काँग्रेस अशी लढत होणार आहे. यातही शहरातील छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघात तिहेरी लढत रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.

