‘लाडक्या बहिणींचा देवाभाऊ’… जोरदार पावसाची हजेरी, मग खुर्च्या डोक्‍यावर…, पावसात भिजतच मंत्र्यांचा महिलांशी संवाद, छत्रपती संभाजीनगरात तारांबळ

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : भारतीय जनता पक्षाने ‘लाडक्या बहिणींचा देवाभाऊ’ हा कार्यक्रम रविवारी (१८ ऑगस्ट) पुंडलिकनगर रोडवरील हनुमान चौकात घेतला. कार्यक्रम सुरू असतानाच जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने महिलांची तारांबळ उडाली. पावसातही कुणीच पळापळ केली नाही. डोक्‍यावर खुर्च्या घेऊन पावसापासून बचाव करण्यात आला. पावसात भिजतच मंत्र्यांसह पदाधिकाऱ्यांनी महिलांशी संवाद साधला. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील बहिणींच्या खात्यावर […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : भारतीय जनता पक्षाने ‘लाडक्या बहिणींचा देवाभाऊ’ हा कार्यक्रम रविवारी (१८ ऑगस्ट) पुंडलिकनगर रोडवरील हनुमान चौकात घेतला. कार्यक्रम सुरू असतानाच जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने महिलांची तारांबळ उडाली. पावसातही कुणीच पळापळ केली नाही. डोक्‍यावर खुर्च्या घेऊन पावसापासून बचाव करण्यात आला. पावसात भिजतच मंत्र्यांसह पदाधिकाऱ्यांनी महिलांशी संवाद साधला.

रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील बहिणींच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झाल्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला होता. मंत्री अतुल सावे, खा. डॉ. भागवत कराड, शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर, संजय केणेकर, बापू घडामोडे, अनिल मकरिये, शिवाजी दांडगे, लक्ष्मीकांत थेटे, जालिंदर शेंडगे, हर्षवर्धन कराड, दीपक ढाकणे, गोविंद केंद्रे, रामेश्वर भादवे, विवेक राठोड, नितीन खरात, रामचंद्र जाधव यांची उपस्थिती होती. या वेळी सावेंसह उपस्थित नेत्यांना महिलांनी राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.

पावसातही कार्यक्रम सुरूच राहिल्याने लहान मुलांसह आलेल्या महिलांची तारांबळ उडाली होती. यावेळी मंत्री सावे म्हणाले, की महिलांच्या आर्थिक सक्षमतेसाठी सरकारने ही योजना सुरू केली असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण ५ लाख ४२ हजार ७५४ अर्ज प्राप्त झाले. यातील ५ लाख ३४ हजार ३१० अर्ज पात्र ठरले आहेत. उर्वरित अर्जाची त्रुटी पूर्तता करून त्या बहिणींनाही लाभ देण्यात येईल, असे ते म्‍हणाले.

…म्‍हणून छत्रपती संभाजीनगरातून टेम्‍पो भरून राख्या मुख्यमंत्र्यांना!
ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या (उमेद) कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रविवारी टेम्पो भरून दीड लाख राख्या पाठविल्या. उमेद अभियानाला शासनाने नियमित विभाग म्हणून मान्यता द्यावी, कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे या मागणीकडे लक्ष वेधण्यासोबतच महिलांसाठी विविध योजना राबविल्याने मुख्यमंत्री शिंदे यांना राखी बांधून त्यांचे अभिनंदन करण्याचाही हेतू आहे, असे जिल्हाध्यक्ष वंदना जोगदंड म्हणाल्या.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software