मोठी बातमी : भाजपकडून अतुल सावे, अनुराधा चव्हाण, प्रशांत बंब यांना उमेदवारी जाहीर, पहिल्या यादीत ९९ जण

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

मुंबई/छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली असून, यात छत्रपती संभाजीनगर पूर्वमधून पुन्हा एकदा अतुल सावे, गंगापूरमधून पुन्हा एकदा प्रशांत बंब आणि फुलंब्री मतदारसंघातून हरिभाऊ बागडे यांच्या वारसरदार म्‍हणून अनुराधा चव्हाण यांना निवडण्यात आले असून, त्‍यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विद्यमान आमदार असल्याने अतुल सावे आणि […]

मुंबई/छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली असून, यात छत्रपती संभाजीनगर पूर्वमधून पुन्हा एकदा अतुल सावे, गंगापूरमधून पुन्हा एकदा प्रशांत बंब आणि फुलंब्री मतदारसंघातून हरिभाऊ बागडे यांच्या वारसरदार म्‍हणून अनुराधा चव्हाण यांना निवडण्यात आले असून, त्‍यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

विद्यमान आमदार असल्याने अतुल सावे आणि प्रशांत बंब यांची उमेदवारी पक्‍की मानली जात होती. मात्र फुलंब्रीतून भाजपला कुणाला संधी देईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. हरिभाऊ बागडे यांना राजस्थानचे राज्‍यपाल करण्यात आल्यानंतर त्‍यांचे वारसदार म्‍हणून कुणाला निवडले जाते, याबद्दल उत्‍सुकता होती. गेल्या १० वर्षांपासून मतदारसंघात तयारी करत असलेल्या अनुराधा चव्हाण यांच्या मेहनतीला अखेर फळ आले आहे. रावसाहेब दानवे यांचे जवळचे मानले जाणारे उपमहापौर विजय औताडे हेही फुलंब्रीतून लढण्यास इच्‍छुक होते. त्‍यासाठी त्‍यांनी प्रयत्‍नही सुरू केले होते. मात्र पक्षश्रेष्ठींनी बागडे यांचे मत या निवडीत महत्त्वाचे मानल्याचे बोलले जात आहे. त्‍यांच्यासमोर आता काँग्रेस कुणाला उभे करते, हे पाहणे रोमांचक ठरणार आहे.

भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत ९९ जणांची नावे आहेत. २०१९ मध्ये भाजपने १६४ जागा लढवून १०५ जागा जिंकल्या होत्या. यंदा भाजप १५० ते १६० जागा लढवण्याची शक्‍यता आहे. यादीत पहिली दोन नावं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची आहेत. देवंेद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिम, तर बावनकुळे यांना कामठीतून उमेदवारी देण्यात आली आहे.

पहिल्या यादीतील ९९ उमेदवार असे…
देवेंद्र फडणवीस- नागपूर दक्षिण पश्चिम
चंद्रशेखर बावनकुळे- कामठी
अनुराधा चव्हाण- फुलंब्री
अतुल सावे- औरंगाबाद पूर्व
प्रशांत बंब- गंगापूर
संतोष दानवे- भोकरदन
बबनराव लोणीकर- परतूर
नारायण कुचे- बदनापूर
श्वेता महाले- चिखली
आकाश फुंडकर- खामगाव
संजय कुटे- जळगाव
रणधीर सावरकर- अकोला पूर्व
विजयकुमार गावीत- नंदुरबार
अनुप अग्रवाल- धुळे शहर
जयकुमार रावल- शिंदखेडा
काशीराम पावरा
अमोल जावळे – रावेर
संजय सावकारे- भुसावळ
सुरेश भोळे- जळगाव
मंगेश चव्हाण- चाळीसगाव
गिरीश महाजन- जामनेर
प्रताप अडसद- धामगाव रेल्वे
प्रवीण तायडे- अचलपूर
राजेश बकाने- देवली
हिंगणघाट- समीर कुणावार
पंकज भोयर- वर्धा
समीर मेघे- हिंगणा
मोहन माते- नागपूर दक्षिण
कृष्ण खोपडे- नागपूर पूर्व
विजय रहांगडाले- तिरोरा
विनोद अग्रवाल- गोंदिया
संजय पुरम- अमगाव
कृष्णा गजबे- आरमोरी
सुधीर मुनगंटीवार- बल्लारपूर
बंटी भांगडिया- चिमूर
संजीवरेड्डी बोडकुरवार- वानी
अशोक उईके- राळेगाव
मदन येरवर- यवतमाळ
भीमराव केरम- किनवट
श्रीजया चव्हाण- भोकर
राजेश पवार- नायगाव
तुषार राठोड- मुखेड
तानाजी मुटकुले- हिंगोली
मेघना बोर्डिकर- जिंतूर
दिलीप बोरसे- बगलान
राहुल अहेर- चंदवड
राहुल ढिकले- नाशिक पूर्व
सीमाताई हिरे- नाशिक पश्चिम
राजन नाईक- नालासोपारा
महेश चौघुले- भिवंडी पश्चिम
किसन कथोरे- मुरबाड
सुलभा गायकवाड- कल्याण पूर्व
रविंद्र चव्हाण- डोंबिवली
संजय केळकर- ठाणे
गणेश नाईक- ऐरोली
मंदा म्हात्रे- बेलापूर
मनिषा चौधरी- दहिसर
मिहिर कोटेचा- मुलुंड
अतुल भातखळकर- कांदिवली पूर्व
योगेश सागर- चारकोप
विनोद शेलार- मालाड पश्चिम
विद्या ठाकूर- गोरेगाव
अमित साटम- अंधेरी पश्चिम
पराग अळवणी- विलेपार्ले
राम कदम- घाटकोपर पश्चिम
आशिष शेलार- वांद्रे पश्चिम
आर. तमिल सेल्वन- सायन कोळीवाडा
कालिदास कोळंबकर- वडाळा

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software