मुस्लिम मतांच्या विभाजनाची जलील यांना भीती!; मुस्लिम बांधवांना केले हे मोठे आवाहन…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या इम्‍तियाज जलील यांना मुस्लिम मतांच्या विभाजनाची भीती आहे. सर्वाधिक ६८ उमेदवार या मतदारसंघात असून, त्‍यात २५ मुस्लिम उमेदवार आहेत. त्‍यामुळे मुस्लिमांच्या मतांच्या विभाजनाचा धोका जलील यांना जाणवू लागला आहे. यासाठी त्‍यांनी सभा घेऊन मतांचे विभाजन टाळण्याचे आवाहन सुरू केले आहे. शुक्रवारी (१ […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या इम्‍तियाज जलील यांना मुस्लिम मतांच्या विभाजनाची भीती आहे. सर्वाधिक ६८ उमेदवार या मतदारसंघात असून, त्‍यात २५ मुस्लिम उमेदवार आहेत. त्‍यामुळे मुस्लिमांच्या मतांच्या विभाजनाचा धोका जलील यांना जाणवू लागला आहे. यासाठी त्‍यांनी सभा घेऊन मतांचे विभाजन टाळण्याचे आवाहन सुरू केले आहे.

शुक्रवारी (१ नोव्‍हेंबर) दुपारी नारेगाव भागात जलील यांनी सभा घेतली. दोन दिवसांपासून त्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. गुरुवारी त्यांनी किराडपुरा भागात दर्गाहला भेट दिली होती. त्यानंतर शुक्रवारी नारेगाव गाठले. या ठिकाणच्या सभेत ते म्हणाले, की मुस्लिम उमेदवाराच्या पराभवासाठी अनेक मुस्लिम उमेदवार उभे करण्याचे षडयंत्र विरोधकांनी रचले आहे. त्यांचे मनसुबे हाणून पाडा. पूर्व आणि मध्यमधील उमेदवाराच्या प्रचारासाठी पक्षाचे नेते अकबरोद्दीन ओवेसी लवकरच शहरात येणार असून त्यांची सभा आमखास मैदान येथे होणार असल्याचे जलील यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघात २५ मुस्लिम उमेदवारांशिवाय १८ मराठा, ११ दलित, १२ ओबीसी आणि २ ब्राह्मण उमेदवार मैदानात उतरले आहेत. मतांचे विभाजन टाळण्याचे आव्हान जसे जलील यांच्यासमोर आहे, तसेच ते अतुल सावे यांच्यासमोरही आहे. मराठा मतांवर काही उमेदवारांची भिस्‍त आहे. ४ नोव्‍हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत वेळ असणार आहे. त्‍यामुळे उमेदवारसंख्या कमी कशी होईल याकडे महायुती आणि महाविकास आघाडीचे प्रयत्‍न प्रामुख्याने दिसून आले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software