मराठा समाजाने आरक्षण मागण्याऐवजी उद्योगधंदे उभारावेत, सिंह कधी आरक्षण मागत नाही शिकार करतो!; हिंदुत्‍ववादी नेते सुरेश चव्हाणके यांचे प्रतिपादन, विचारांवर ठाम राहिलो तर शत्रूसुद्धा सन्मान करेल, कुणाला अप्रत्‍यक्ष टोला याचीच कार्यक्रमात चर्चा

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मराठा समाजाने आरक्षण मागण्याऐवजी स्वकर्तृत्वावर उद्योगधंदे उभारावेत. सिंह कधीही आरक्षण मागत नाही, तो शिकार करतो. याप्रमाणे मराठा समाजानेही आरक्षण न मागता उद्योग व्यवसायाकडे वळले पाहिजे, असे वक्‍तव्‍य प्रख्यात हिंदुत्‍वादी नेते तथा सुदर्शन न्‍यूज चॅनेलचे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके यांनी छत्रपती संभाजीनगरात आज, १ जानेवारीला सकाळी केले. आपले विचार हे कधीही […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मराठा समाजाने आरक्षण मागण्याऐवजी स्वकर्तृत्वावर उद्योगधंदे उभारावेत. सिंह कधीही आरक्षण मागत नाही, तो शिकार करतो. याप्रमाणे मराठा समाजानेही आरक्षण न मागता उद्योग व्यवसायाकडे वळले पाहिजे, असे वक्‍तव्‍य प्रख्यात हिंदुत्‍वादी नेते तथा सुदर्शन न्‍यूज चॅनेलचे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके यांनी छत्रपती संभाजीनगरात आज, १ जानेवारीला सकाळी केले. आपले विचार हे कधीही सोडू नये. त्यावर ठाम राहावेत. जर आपण आपल्या विचारांवर ठाम राहिलो तर आपला शत्रूसुद्धा आपला सन्मान करील, अशी टीका त्‍यांनी कुणावर केली, याबद्दल कार्यक्रमात चर्चा दिसून आली.

डब्‍ल्‍यूएमबीएन फाऊंडेशन, छावा मराठा संघटना आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे आयोजित मराठा उद्योजक मेळाव्यात चव्हाणके बोलत होते. कट्टर हिंदुत्‍ववादी भाषणांमुळे चव्हाणके ओळखले जातात. मराठाभूषण डॉ. विलास पांगारकर यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सिंदखेड राजा येथील लखोजीराव जाधव यांचे वंशज शिवाजीराजे जाधव, कानसा वारणा फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक पाटील, छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक शुभम खरात यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी किशोर चव्हाण म्हणाले, की ⁠मराठा आरक्षणासाठी मराठा मुलांनी आत्महत्या करू नका. ईडब्‍ल्‍यूएसचे आरक्षण आपण २० टक्‍क्‍यांवर नेण्याची मागणी करू, असे ते म्‍हणाले. ⁠दुसऱ्या समाजासाठी कोणताही वाईट शब्द वापरू नका, असे आवाहनही त्‍यांनी केले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software