मराठा आरक्षणासाठी राजश्री उंबरे यांचे क्रांती चौकात उपोषण, मोठा प्रतिसाद मिळतोय!; समर्थनासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी क्रांतीचौक पाडला काहीकाळ ठप्प

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन; विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपसरपंच शेख वसीम यांचे ‘ऑन व्हील’ उपोषण सुरू; ‘आदर्श’च्या ठेवीदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मराठा आरक्षणासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानच्या प्रदेशाध्यक्षा राजश्री रुस्तुम उंबरे या आता मैदानात उतरल्या आहेत. सोमवारपासून (२ सप्टेंबर) क्रांती चौकात त्यांनी उपोषण […]

रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन; विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपसरपंच शेख वसीम यांचे ‘ऑन व्हील’ उपोषण सुरू; ‘आदर्श’च्या ठेवीदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मराठा आरक्षणासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानच्या प्रदेशाध्यक्षा राजश्री रुस्तुम उंबरे या आता मैदानात उतरल्या आहेत. सोमवारपासून (२ सप्टेंबर) क्रांती चौकात त्यांनी उपोषण सुरू केले. त्यांच्या उपोषणाला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

मराठवाड्यात हैदराबाद गॅझेट लागू करून त्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. यापूर्वी मराठा समाजाला लागू केलेले ईडब्ल्यूएस आरक्षण पूर्ववत सुरू करावे, शेतकरी, कामगार व शेतमजूर यांच्या मुलांना मोफत शिक्षण द्यावे या मागण्यांसाठी त्‍या उपोषणाला बसल्या आहेत. उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब आवारे यांच्यासह सुमारे ५० ते ६० कार्यकर्ते, पदाधिकारी मंगळवारी सायंकाळी ५ च्या सुमारास क्रांती चौकात आले. त्यांनी वाहने चौकातच उभी करून जोरदार घोषणाबाजी सुरू करत रस्ता अडवला. त्यामुळे क्रांती चौक ठप्प झाला.

क्रांती चौक पोलीस आणि शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक अमोल देवकर आणि कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेऊन रस्त्यावरील वाहने हटवून वाहतूक सुरळीत केली. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईत बीड जिल्ह्याने नेहमीच पुढाकार घेतला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आपले उपोषण सुरू राहणार असल्याचा इशारा राजश्री उंबरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे धरणे आंदोलन
अनुसूचित जाती, जमातीचे आरक्षण उपवर्गीकरण आणि या प्रवर्गाला क्रिमिलेअरची अट लागू करण्याचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय त्वरित मागे घेण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मंगळवारी (२ सप्‍टेंबर) धरणे आंदोलन केले. आंदोलनानंतर संघटनेचे अध्यक्ष राजू साबळे, अविनाश थिट्टे, सुरेश शिनगारे, सुनील कोतकर, अनिल ढाले, अय्युब पटेल यांच्या शिष्टमंडळाने उपायुक्त जगदिश मनियार यांना मागण्यांचे निवेदन दिले. जोरदार घोषणाबाजी करून आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलनात रणजीत मनोरे, अर्शद लखपती, सुनील खरात, जयनाथ बोर्डे सुधाकर साबळे, मंगला पंदिकर, अनिता शेजवळ, कल्पना जमधडे, अरुणा साठे, सोनाली चव्हाण, अलका कांबळे, मनिषाताई बेलकर आदी पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता.

उपसरपंच शेख वसीम यांचे ‘ऑन व्हील’ उपोषण सुरू
तडेगाव (ता. भोकरदन, जि. जालना) ग्रामपंचायतीमधील गैरकारभाराच्या चौकशीची मागणी करत उपसरपंच शेख वसीम शेख खाजा यांनी चक्क चारचाकीत बसून विभागीय आयुक्तालयासमोर मंगळवारी उपोषण सुरू केले. या ऑन व्हील उपोषणाची चर्चा सुरू झाली आहे. शेख वसीम यांनी म्हटले की, ग्रामसेवक व सरपंचाने १५ व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये भूमिगत गटार, पेव्हर ब्लॉक, घनकचरा व्यवस्थापन, नळ कनेक्शन जोडणीसह इतर कामे बोगस केली आहेत. ग्रामसभेत कोणतीही चर्चा न करता बनावट ठराव, खोट्या स्वाक्षऱ्या केल्या, असा आरोप त्यांनी केला. या कामांच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.

‘आदर्श’च्या ठेवीदारांचे ठिय्या आंदोलन
आदर्श सहकारी बँकेच्या ठेवीदारांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. बँक घोटाळ्यातील काही आरोपींची सुटका होत आहे. अनेकांना पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही. गोठवलेल्या मालमत्तांची काही राजकीय नेतेमंडळींच्या हस्तक्षेपाने खरेदी- विक्री केली जात असल्याचा आरोप एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी या वेळी केला. आंदोलकांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software