बिडकीन एमआयडीसीसाठी जमिनी दिलेल्या प्रकल्पग्रस्तांना लवकरच आर्थिक मोबदला; उद्योगमंत्री सामंतांची माहिती, बिडकीन औद्योगिक प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसंदर्भात बैठक

On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र

छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : उद्योगांमध्ये स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्याची शासनाची भूमिका आहेच. आहे त्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी दिली जाईल. शिवाय आवश्यक कुशल मनुष्यबळासाठी कंपनीमार्फत कौशल्य प्रशिक्षण देऊन स्थानिकांना नोकरीत सामावून घेतले जाईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज, १२ ऑगस्टला सांगितले. जिल्ह्यातील बिडकीन एमआयडीसीसाठी जमिनी दिलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा आर्थिक मोबदला […]

छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : उद्योगांमध्ये स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्याची शासनाची भूमिका आहेच. आहे त्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी दिली जाईल. शिवाय आवश्यक कुशल मनुष्यबळासाठी कंपनीमार्फत कौशल्य प्रशिक्षण देऊन स्थानिकांना नोकरीत सामावून घेतले जाईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज, १२ ऑगस्टला सांगितले. जिल्ह्यातील बिडकीन एमआयडीसीसाठी जमिनी दिलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा आर्थिक मोबदला देण्यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊ, ही सगळी प्रकरणे १७ ऑगस्टला मंत्रालयात पाठवावी, असे निर्देशही त्यांनी यंत्रणांना दिले.

बिडकीन औद्योगिक प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसंदर्भात आज उद्योग मंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समिती सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, अर्जुन खोतकर, प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मलिकनेर, सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी चेतन गिरासे तसेच बिडकीन सरपंच व प्रकल्पग्रस्त शेतकरी आदी उपस्थित होते.

श्री. सामंत यांनी निर्देश दिले की, जमिनी संपादित झालेल्या शेतकऱ्यांपैकी वर्ग २ जमिनीचा मोबदला ७० टक्के देण्यात आला आहे. उर्वरित मोबदला न दिलेल्या २२५ प्रकरणांपैकी ७५ प्रकरणात मोबदला देण्यात आला आहे. शिल्लक १५० प्रकरणे संकलित करून जिल्हा व विभागस्तरावरील मान्यता घेऊन १७ ऑगस्ट रोजी शासनाकडे पाठवावे. शासनस्तरावरून लवकरात लवकर निर्णय होऊन शेतकऱ्यांना मोबदला देण्याबाबत कार्यवाही होईल,अशी ग्वाही सामंत यांनी दिली. त्याचप्रमाणे वृक्ष, विहीर मोबदला देण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार ११ कोटी २६ लक्ष रुपयांचा निधी वर्ग केला जाईल. शेतकऱ्यांना भूसंपादन प्रमाणपत्र देण्यात यावे, असे निर्देशही श्री. सामंत यांनी दिले.

श्री. सामंत म्हणाले की, शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या म्हणून तेथे इतक्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येऊ शकली. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याकडे शासनाची भूमिका आहे. याच शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शैक्षणित पात्रतेप्रमाणे नोकरी देण्यास प्राधान्य असेल. शिवाय तशी शैक्षणिक पात्रता नसली तरी उद्योग त्यांना लागणाऱ्या कौशल्याचे प्रशिक्षण देतील आणि त्या उमेदवारांना नोकरीत सामावून घेतले जाईल, असेही श्री. सामंत यांनी स्पष्ट केले. बिडकीन येथे एक सभागृह बांधणे, औद्योगिक वसाहतीच्या सिमेवर असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतात येण्या जाण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही अशा पद्धतीने रचना करणे, कौशल्य प्रशिक्षणासाठी कन्व्हेंशन सेंटर आदी आश्वासनेही श्री. सामंत यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरात महिनाभरात आढळले ८ मृतदेह, ज्यांची ओळख पटली नाही, अशा अवस्थेत होते, की तुम्ही बघूही शकणार नाही...

Latest News

छत्रपती संभाजीनगरात महिनाभरात आढळले ८ मृतदेह, ज्यांची ओळख पटली नाही, अशा अवस्थेत होते, की तुम्ही बघूही शकणार नाही... छत्रपती संभाजीनगरात महिनाभरात आढळले ८ मृतदेह, ज्यांची ओळख पटली नाही, अशा अवस्थेत होते, की तुम्ही बघूही शकणार नाही...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगर शहरात अनोळखी मृतदेह मिळून येण्याचे प्रमाण लक्षणीय ठरत आहे. १ ऑक्‍टोबरपासून...
सामाजिक कार्यकर्तीच्या फेसबुक पोस्टवर अश्लील शिवीगाळीचा भडीमार, पोलिसांनी २३ जणांविरुद्ध केला गुन्हा दाखल, छत्रपती संभाजीनगरातील प्रकार
लई हुशारी केली, पण शेवटी घडा भरलाच!; ‘कायद्या’चा गैरवापर करून लाखो रुपये उकळले, अखेर दुकलीला आता पडल्या बेड्या!!, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण सायबर पोलिसांची कामगिरी, नक्की काय आहे स्टोरी वाचूया... 
मंजूरपुऱ्यातील ‘बॉस पब्लीक चॉईस’ रेडिमेड कपड्यांचे दुकान फोडले, चोरट्यांनी शर्ट-पँट नेले...
गोमटेश मार्केटमध्ये भल्ला चाट भंडारसमोर तरुणांमध्ये हाणामारी!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software