दानवेंसोबतच्या भांडणामुळे सिल्लोडमध्ये भाजप सत्तारांच्या विरोधात; सत्तारांनी धमकीच दिली…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : भाजपचे ज्‍येष्ठ नेते रावसाहेब दानवे आणि मंत्री अब्‍दुल सत्तार यांच्यातील संघर्ष चांगलाच पेटला आहे. आधी सत्तार समर्थकांनी दानवेंविरुद्ध मोर्चा काढला, नंतर दानवे समर्थकांनी सत्तारांविरुद्ध मोर्चा काढला. भाजपने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे सत्तारांपुढे संकट निर्माण झाले आहे. शिंदे गट आणि भाजपची युती असली तरी बंडखोरीचीही शक्‍यता निर्माण झाली आहे. सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील भाजपला मानणारा […]

सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : भाजपचे ज्‍येष्ठ नेते रावसाहेब दानवे आणि मंत्री अब्‍दुल सत्तार यांच्यातील संघर्ष चांगलाच पेटला आहे. आधी सत्तार समर्थकांनी दानवेंविरुद्ध मोर्चा काढला, नंतर दानवे समर्थकांनी सत्तारांविरुद्ध मोर्चा काढला. भाजपने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे सत्तारांपुढे संकट निर्माण झाले आहे. शिंदे गट आणि भाजपची युती असली तरी बंडखोरीचीही शक्‍यता निर्माण झाली आहे. सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील भाजपला मानणारा मतदार दुरावण्याची शक्‍यता लक्षात येताच सत्तारांनी भाजपला आज, ३ ऑक्‍टोबरला अक्षशः धमकीच दिली. सिल्लोडमध्ये भाजपाने विरोध केला तर शिवसैनिक महाराष्ट्रात भाजपाला जशास तसे उत्तर देतील, असा इशारा सत्तार यांनी भाजपाला दिला आहे.

भराडी येथे मराठवाड्यातील पहिल्या मिरची प्रक्रिया केंद्राच्या भूमिपूजनानंतर सत्तार म्हणाले, सिल्लोडमध्ये भाजपवाले जसे काम करतील त्याच पद्धतीने शिवसैनिक मराठवाडा व महाराष्ट्रात काम करतील. त्यांना जशास तसे उत्तर मिळेल, असे ते म्‍हणाले. महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरुद्ध सत्तारांना लढत द्यावी लागणार आहे. सत्तारांविरुद्ध उभा केलेला उमेदवार निवडून आणण्यासाठी मविआचेे तिन्ही पक्ष कंबर कसणार आहे. अशा स्थितीत दानवेंसोबतच्या भांडणामुळे भाजपला मानणारा मतदारही दुरावला आहे. भाजप पदाधिकारी सत्तारांचे काम करण्याची शक्‍यता कमीच दिसून येत आहे. त्‍यामुळे सत्तारांना भाजपला इशारा द्यावा लागल्याची चर्चा आहे. अर्थात या इशाऱ्याला भाजपचे वरिष्ठ कितपत गांभीर्याने घेतात, हेही महत्त्वाचे आहे.

भोकरदनमध्ये सुपडा साफ करणार…
आपल्यावर टीका करणाऱ्यांचा आगामी विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ करणार, असा इशारा सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांना दिला. आगामी विधानसभा निवडणुकीत माझा राज्‍यातील पहिल्या पाच विजयी उमेदवारांत नंबर असेल, असा दावाही त्‍यांनी कंकराळा येथील विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात केला.

शरद पवार गटाला हवा सिल्लाेड मतदारसंघ
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला सिल्लोड-सोयगाव मतदारसंघ हवा आहे. हा मतदारसंघ आपल्या पक्षाला सोडवून घ्यावा, अशी मागणी ज्‍येष्ठ नेते रंगनाथ काळे रविवारी शरद पवार यांची भेट घेऊन केली. हा मतदारसंघ आधी काँग्रेसकडे होता. गेल्या निवडणुकीत सत्तारांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली. नंतर ते शिंदे गटात गेले. आता महाविकास आघाडीत हा मतदारसंघ ठाकरे गटाला सुटणार असल्याची चर्चा आहे. त्‍यामुळे रंगनाथ काळे यांनी बारामतीला जाऊन शरद पवारांची भेट घेत दोन तास यावर चर्चा केली. पवार यांनी सकारात्‍मक प्रतिसाद दिल्याचे काळे यांनी पत्रकारांना सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software