ठाकरे गटाची मदार मुस्लिम मतांवर?; दानवे काय म्‍हणाले…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभेच्या छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातील उमेदवार राजू शिंदे हे एमआयएम पुरस्कृत उमेदवार असल्याचा आरोप महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट यांनी केला आहे. त्‍यावर आ. अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिरसाट यांचे आरोप खोडून काढले. एमआयएम ही संघटना देश विघातक विचारांची असून धर्मवाद पसरवणारी आहे. त्यांच्या करणी आणि कथनीत फरक आहे. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभेच्या छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातील उमेदवार राजू शिंदे हे एमआयएम पुरस्कृत उमेदवार असल्याचा आरोप महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट यांनी केला आहे. त्‍यावर आ. अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिरसाट यांचे आरोप खोडून काढले. एमआयएम ही संघटना देश विघातक विचारांची असून धर्मवाद पसरवणारी आहे. त्यांच्या करणी आणि कथनीत फरक आहे. एमआयएम भाजपची बी टीम आहे. आम्हाला मुस्लिम मते मिळू नये म्‍हणून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनीच खेळी केली असून, तेच एमआयएमचा वापर करत आहेत, असा आरोप दानवे यांनी केला.

अंबादास दानवे म्हणाले, की एमआयएम ही रझाकार विचारांची आहे. मुस्लिमांनीही एमआयएमकडे जाऊ नये. ते महाराष्ट्रात मोजक्या १०-१२ जागा लढतेय. त्यामुळे त्यांचे आमदार निवडून येऊनही सरकार बनणार नाही. एमआयएम भाजप आणि शिंदे गटाला मदत करणारा पक्ष आहे. राज्यात ५ वर्षे एमआयएमचे २ आमदार होते, त्यांनी गेल्या अडीच वर्षांत शिंदे यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली. त्‍यामुळेच त्यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी आणि इतर लाभ पोहोचवले गेले, असा आरोपही दानवे यांनी केला. गेल्यावेळीही एमआयएमचा वापर आ. संजय शिरसाटांनी केला होता. यावेळीही ते तसेच करत आहेत. सध्या मुस्लिमांचा ओढा ठाकरे गटाकडे आहे. ही मुस्लीम मते आम्हाला न मिळता ती एमआयएमला जावीत असा प्रयत्‍न शिरसाट आणि भाजपचा आहे, असे दानवे म्‍हणाले.

काय म्हणाले होते शिरसाट..
मी सर्वसामान्य घरातून आलेल्या कामगाराचा मुलगा आहे. सर्वसामान्य लोकांचा आमदार आहे. बाहेरच्या मतदासंघातील लोक पश्चिम विधानसभा मतदारसंघात विकास केल्याचे सांगत आहेत; पण या जनतेला माहिती आहे की, विकासाचे दुसरे नाव संजय शिरसाट आहे. उद्धवसेनेला मतदान म्हणजे ‘एमआयएम’ला मतदान करण्यासारखे आहे, असे महायुतीचे ‘पश्चिम’चे उमेदवार आ. संजय शिरसाट म्हणाले होते.

उद्धव ठाकरे यांची १४ नोव्‍हेंबरला सभा
उद्धव ठाकरे यांची जिल्ह्यातील ९ उमेदवारांच्या प्रचारार्थ मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता सभा होणार आहे. त्‍याआधी दुपारी ३ वाजता कन्नड येथे आमदार उदयसिंग राजपूत यांच्या प्रचारार्थ तर दुसऱ्या दिवशी १५ नोव्हेंबर रोजी सिल्लोड येथे सुरेश बनकर यांच्या प्रचारार्थ जाहीर विराट सभा होणार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software