ठाकरे गटाचं कट्टर हिंदुत्‍व संपल्यात जमा?; छत्रपती संभाजीनगरात मुस्लिम मतांसाठी धडपड, शरद पवार-काँग्रेसच्या संगतीत विचारही बदलत असल्याची चर्चा

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कधीकाळी कट्टर हिंदुत्‍वासाठी ओळखल्या जाणाऱ्या ठाकरे गटाची आजची भूमिका पाहिली तर कुणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. कट्टर हिंदुत्‍व ते धर्मनिरपेक्ष ही वाटचाल आश्चर्यजनक आहे. हा बदल कशामुळे झाला याचेही कारण लगेचच समोर येते. शरद पवार गट- काँग्रेस हे दोन्ही पक्ष धर्मनिरपेक्ष म्‍हणून ओळखले जातात. त्‍यांच्या संगतीत ठाकरे गटानेही कट्टर हिंदुत्‍व […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कधीकाळी कट्टर हिंदुत्‍वासाठी ओळखल्या जाणाऱ्या ठाकरे गटाची आजची भूमिका पाहिली तर कुणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. कट्टर हिंदुत्‍व ते धर्मनिरपेक्ष ही वाटचाल आश्चर्यजनक आहे. हा बदल कशामुळे झाला याचेही कारण लगेचच समोर येते. शरद पवार गट- काँग्रेस हे दोन्ही पक्ष धर्मनिरपेक्ष म्‍हणून ओळखले जातात. त्‍यांच्या संगतीत ठाकरे गटानेही कट्टर हिंदुत्‍व त्‍यागून हिंदुत्‍वाची नवी परिभाषा तयार केल्याची चर्चा आजघडीला होताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगरातील दोन्ही उमेदवारांसाठी ठाकरे गटाला मुस्लिम मतांची गरज का भासते आणि त्‍यासाठी त्‍यांचे इतके आकाडतांडव का आहे, याचे कारण यात दडलेले आहे. शिंदे गट आणि भाजप कट्टर हिंदुत्‍वाचा पुरस्कार करत असताना आणि हिंदुत्‍ववादी मते तिकडे वळतील, ही भीती असल्याने आता ठाकरे गटाचा मुस्लिम मतांकडे ओढा वाढला आहे. लोकसभेतही हा प्रयोग झाला आणि आता विधानसभेतही तोच कित्ता गिरवला जात आहे.

छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात ठाकरे गटाचे राजू शिंदे आणि मध्य मतदारसंघात बाळासाहेब थोरात हे उमेदवार आहेत. पैकी राजू शिंदे हे एमआयएम पुरस्कृत उमेदवार असल्याचा आरोप शिंदे गटाचे आ. संजय शिरसाट यांनी केला आहे. हा आरोप फेटाळून लावत एमआयएम ही भाजपचीच बी टीम असल्याचे सांगून आ. अंबादास दानवे यांनी आम्हाला मुस्लिम मते मिळू नये म्‍हणून शिंदे गट आणि भाजप प्रयत्‍न करत असल्याचा आरोप केला. त्‍यांच्या या वक्‍तव्‍यातून ठाकरे गटासाठी मुस्लिम मते किती आवश्यक आहे, हे अधोरेखित होत असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. मध्य मतदारसंघात मुस्लिम धर्मगुरू मौलाना सज्‍जाद नोमाणी यांनी बाळासाहेब थोरात यांना पाठिंबा जाहीर करून ठाकरे गटाची मुस्लिम मतांची निकड काही अंशी भागवल्याचे बोलले जात आहे. कधीकाळी हिंदुत्‍ववादी मतांच्या भरवशावर राजकारण करणाऱ्या ठाकरे गटावर आलेली ही वेळ निश्चितच बदलेल्या राजकरणाची दिशा स्‍पष्ट करते, अशी चर्चा होत आहे.

शिंदे गट, भाजपच्या भूमिकेमुळे ही वेळ?
शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्‍ववादी विचारांना पुढे नेऊन वाटचाल सुरू केली आहे. भाजप हा कट्टर हिंदुत्‍ववादी पक्ष म्‍हणून ओळखला जातो. दोन्ही पक्षांनी हिंदुत्‍व निवडल्याने साहाजिकच हिंदुत्‍ववादी मतांचा ओढा त्‍यांच्याकडे वाढला. त्‍यात ठाकरे गटाने काँग्रेस-शरद पवार गटाशी आघाडी केल्याने विचारांतही हळूहळू परिवर्तन येत असल्याचे दिसून येते. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी मुस्लिम बांधवांच्या भेटीगाठी, बैठका घेऊन ही मते पदरात पाडण्यासाठी प्रयत्‍न केले होते. आता पश्चिम आणि मध्य मतदारसंघाच्या उमेदवारांच्या विजयासाठी पुन्हा मुस्लिम मतांसाठी प्रयत्‍न केले जात आहेत. नोमाणी यांच्या पाठिंब्यामुळे त्‍यांच्या प्रयत्‍नांना यशही मिळत असल्याचे चित्र आहे.

शहराच्या विकासाचे काय?
या विधानसभा निवडणुकीत विकासाचे मुद्दे कुठेच दिसत नाहीत. शहराचे अनेक प्रमुख प्रश्न प्रलंबित आहेत. त्‍या प्रश्नांवर चर्चा करालायही कुणाला वेळ नाही. सारेच प्रमुख पक्ष धार्मिक ध्रुवीकरणात व्यस्त आहेत. गेल्या ७ वर्षांत डीएमआयसीत तुरळक उद्योग येथे सुरू झाले आहेत. रोजगार वाढविण्यासाठी काय करणार हे कुणी सांगताना दिसत नाहीत. रस्ते, रेल्वे, सिंचन यावरही कुणी बोलताना दिसत नाही. त्‍यामुळे मतदारांत मात्र नाराजी वाढत चालली आहे. पाणीपुरवठा योजनेच्या तारखांवर तारखा दिल्या जात आहेत. प्रत्‍यक्षात शहरवासियांना या योजनेचे पाणी अद्याप मिळालेले नाही. छत्रपती संभाजीनगर राज्‍याची पर्यटन राजधानी आहे. पर्यटन विकासावर बरेच काही बोलण्यासारखे आहे. मात्र त्‍यावरही कुणी भाष्य करत नाही. मुलभूत समस्या सुटत नाही अन्‌ धर्माच्या नावावर मते मागणाऱ्यांची संख्या जास्त झाली आहे. त्‍यामुळे आता मतदारांनाच योग्य तो निर्णय घ्यावा लागणार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software