- News
- पॉलिटिक्स
- जलील यांच्यावर गंभीर आरोप करून डॉ. कादरी यांची MIM ला सोडचिठ्ठी!, जलील म्हणाले ‘नो कमेंट्स’
जलील यांच्यावर गंभीर आरोप करून डॉ. कादरी यांची MIM ला सोडचिठ्ठी!, जलील म्हणाले ‘नो कमेंट्स’
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : एमआयएमचे कार्याध्यक्ष डॉ. अब्दुल गफ्फार कादरी यांनी प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप करून पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याकडे राजीनामा पाठवल्यानंतर त्यांनी मंगळवारी (२२ ऑक्टोबर) सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर जलील पक्ष चालवतात. ते चीटर आहेत. छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघात अतुल सावे यांना […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : एमआयएमचे कार्याध्यक्ष डॉ. अब्दुल गफ्फार कादरी यांनी प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप करून पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याकडे राजीनामा पाठवल्यानंतर त्यांनी मंगळवारी (२२ ऑक्टोबर) सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर जलील पक्ष चालवतात. ते चीटर आहेत. छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघात अतुल सावे यांना निवडून आणण्यासाठी कमकुवत उमेदवार देण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. जलील यांनी नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक लढविण्यापेक्षा नागपुरात फडणवीस यांच्या विरोधात लढून दाखवावे, असे आव्हान डॉ. कादरी यांनी दिले. वंचित बहुजन आघाडीसोबतची युतीही जलील यांनीच तोडल्याचा आरोपही केला. दरम्यान, डॉ. कादरी यांच्या आरोपांबाबत जलील यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी नो कमेंट्स एवढीच प्रतिक्रिया दिली.
छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातूनच मी यंदा निवडणूक लढविणार असून, काँग्रेस पक्षासोबत बोलणी सुरू आहे. मी दिल्लीला जाऊन आलो. दोन ते तीन दिवसात अंतिम निर्णय होईल, असा दावाही डॉ. कादरी यांनी केला. डॉ. कादरी यांनी यापूर्वी २०१४ आणि २०१९ मध्ये अतुल सावेंच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढली. २०१४ मध्ये त्यांचा अवघ्या ४ हजार २६० मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर २०१९ मध्ये ते १३ हजार ९३० मतांनी पराभूत झाले होते.

