छ. संभाजीनगरात रात्री उशिरापर्यंत महायुतीत जागा वाटपाची खलबते!; शहा-फडणवीस-शिंदे-पवारांची बैठक मध्यरात्री १ ला संपली…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत जागा वाटप कसे असेल, यावर मंगळवारी (२४ सप्टेंबर) उशिरापर्यंत खलबते झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील बैठक मध्यरात्री १ ला संपली. सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच निर्णयाची घोषणा होईल, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत जागा वाटप कसे असेल, यावर मंगळवारी (२४ सप्टेंबर) उशिरापर्यंत खलबते झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील बैठक मध्यरात्री १ ला संपली. सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच निर्णयाची घोषणा होईल, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली.

संघाचा सल्ला दुर्लक्षित करून विधानसभा निवडणुकीतही अजित पवारांना सोबत घेण्यावर अमित शहा ठाम असल्याचे दिसून आले. शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये महायुतीच्या नेत्‍यांमध्ये जागा वाटपावर चर्चा झाली. बैठकीला प्रफुल्ल पटेल, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीयमंत्री भूपेंद्र यादव हेही उपस्थित होते. विधानसभेची रणनीती, सामाजिक आंदोलने, जागा वाटप, विरोधकांचे मुद्दे यावर बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. बैठक संपल्यावर रात्री १ च्या सुमारास मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री हॉटेलमधून बाहेर पडले. विमानतळावर मुख्यमंत्री शिंदे यांना पत्रकारांनी गाठले. यावेळी ते म्हणाले, की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. आम्ही सुरुवातीपासूनच सकारात्मक आहोत. जे होईल ते समन्वयाने होईल. जागा वाटपावर लवकरच निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software