- Marathi News
- पॉलिटिक्स
- छ. संभाजीनगरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची जय्यत तयारी, उद्या वाहतूक व्यवस्थेत होणार मोठे ब...
छ. संभाजीनगरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची जय्यत तयारी, उद्या वाहतूक व्यवस्थेत होणार मोठे बदल, उद्धव ठाकरेंची सभाही रेकॉर्डब्रेक करण्यासाठी प्रयत्न
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी (१४ नोव्हेंबर) दुपारी एकला चिकलठाणा एमआयडीसीतील ग्रॅहमफर्थ कंपनीच्या १५ एकर जागेवर विराट जाहीर सभा होत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९ आणि जालना जिल्ह्यातील ५ विधानसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी श्री. मोदी शहरात सभा घेत आहेत. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी (१४ नोव्हेंबर) दुपारी एकला चिकलठाणा एमआयडीसीतील ग्रॅहमफर्थ कंपनीच्या १५ एकर जागेवर विराट जाहीर सभा होत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९ आणि जालना जिल्ह्यातील ५ विधानसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी श्री. मोदी शहरात सभा घेत आहेत.
सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने शहर पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे. त्यानुसार, दुपारी १२ ते ४ या वेळेत जळगाव टी पॉईंट ते केम्ब्रिज चौक बंद करण्यात येणार. या रस्त्यासाठी पर्यायी दोन रस्ते आहे. शहरातून बाहेर पडणाऱ्यांसाठी जळगाव टी पॉईंट- सिडको एन १ चौक- वोखार्ड टी- लहुजी साळवे चौक- नारेगाव टी मार्गे सावंगी बायपासकडून केम्ब्रिज चौक असा पर्यायी मार्ग असेल. बायपास, केम्ब्रिज चौकाकडून शहरात येणाऱ्यांसाठी बीड बायपास, झाल्टा फाटा, केम्ब्रिज चौक, सावंगी बायपास, नारेगाव टी. लहुजी साळवे चौक, वोखार्ड टी मार्गे एन-१ चौकाकडून जळगाव टी पॉईट या मार्गाचाही वापर करावा.
महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांचीही १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहाला मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा होत आहे. या सभेची जय्यत तयारी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सुरू केली आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळ हे बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांनी गाजविलेले आहेत. उद्धव ठाकरे यांच्याही यापूर्वी तेथे अनेक सभा झाल्या आहेत.
सभेला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, यासाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी बैठक झाली. यानंतर आ. अंबादास दानवे, महानगरप्रमुख राजू वैद्य, माजी महापौर नंदकुमार घोडेले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ख्वाजा भाई, अभिषेक देशमुख आणि काँग्रेसचे युसूफ शेख यांनी मैदानाची पाहणी केली. सभेसाठी येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी खुर्चा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. या सभेआधी उद्धव ठाकरे हे दुपारी ३ वाजता कन्नड येथे आमदार उदयसिंग राजपूत यांच्या प्रचारार्थ तर दुसऱ्या दिवशी १५ नोव्हेंबर रोजी सिल्लोड येथे सुरेश बनकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत.
