छ. संभाजीनगरातील ९ पैकी ६ जागांवर काँग्रेसचा डोळा!; खा. कल्याण काळेंनी सांगितले मनसुबे, ३ जागांवर ठाकरे गट-शरद पवार गटाची बोळवण?

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अनपेक्षित यशामुळे सध्या काँग्रेस हवेत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९ पैकी तब्‍बल ६ जागांवर काँग्रेस दावा सांगणार असल्याचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्‍यामुळे केवळ ३ जागांवर ठाकरे गट आणि शरद पवार गटाची बोळवण करणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जागा वाटपावरून […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अनपेक्षित यशामुळे सध्या काँग्रेस हवेत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९ पैकी तब्‍बल ६ जागांवर काँग्रेस दावा सांगणार असल्याचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्‍यामुळे केवळ ३ जागांवर ठाकरे गट आणि शरद पवार गटाची बोळवण करणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जागा वाटपावरून जिल्ह्यात तिन्ही पक्षांत धुसफूस वाढणार असल्याची चिन्हे आहेत.

महाविकास आघाडीत काँग्रेस आता मोठा भाऊ झाल्याचा दावा करत आहे. सुभेदारी विश्रामगृहावर खा. डॉ. कल्याण काळे यांनी शुक्रवारी (९ ऑगस्ट) पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मराठवाडा दौऱ्याची माहिती दिली. मराठवाड्यातून निवडून आलेल्या काँग्रेसच्या तीन खासदारांचा सत्कार पटोले यांच्या दौऱ्यात होणार आहे.

१० ऑगस्टला पटोले लातूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. ११ ऑगस्ट नांदेड आणि १३ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरात ते येतील. २०१९ मध्ये जिल्ह्यात फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर पूर्व, पश्चिम व सिल्लोड येथून काँग्रेसने निवडणूक लढवली होती. या वेळी दोन विधानसभा मतदारसंघ वाढवून मागणार असल्याचे खा. काळे म्हणाले. जालना जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघांवर दावा राहणार असल्याचे ते म्‍हणाले.

पत्रकार परिषदेत खा. काळे यांनी सत्तारांची अशी केली पाठराखण…
अब्दुल सत्तार यापूर्वी आमचे नेते राहिलेले आहेत.
सत्तार मराठा नेतृत्व संपवत असल्याच्या रावसाहेब दानवे यांच्या आरोपात तथ्य नाही.
सिल्लोड मतदारसंघात मराठा समाज सत्तार यांना सर्वाधिक मतदान करताे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अध्यक्ष सत्तारांनी मराठा समाजाचा केला आहे.
सत्तार यांनी शिंदेसेनेसोबतचा प्रासंगिक करार संपुष्टात आणावा, असे आपल्याला वाटते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software