छ. संभाजीनगरातील मध्य, पूर्व, पश्चिम मतदारसंघांवर ठोकला काँग्रेसने दावा, ठाकरे गटात वाढली चलबिचल!!

On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आगामी काळात जागावाटपावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटात बिघाडी होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. कारण काँग्रेसने ठाकरे गटाचा मजबूत दावा असलेल्या छत्रपती संभाजीनगरातील मध्य, पूर्व आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघांसाठी आग्रह धरला असून, तसा बैठकीत ठरावही केला आहे. मंगळवारी (२३ जुलै) शहागंज येथील गांधी भवनात झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत या जागा […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आगामी काळात जागावाटपावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटात बिघाडी होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. कारण काँग्रेसने ठाकरे गटाचा मजबूत दावा असलेल्या छत्रपती संभाजीनगरातील मध्य, पूर्व आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघांसाठी आग्रह धरला असून, तसा बैठकीत ठरावही केला आहे. मंगळवारी (२३ जुलै) शहागंज येथील गांधी भवनात झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत या जागा पक्षाकडे घेण्यासाठी आक्रमक होण्याचे ठरविण्यात आले. त्‍यामुळे मोठाच पेच ठाकणार आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षांची महाआघाडी आहे. मात्र या तिन्ही पक्षांत आगामी काळात जागा वाटपावरून धुसफूस वाढण्याची शक्‍यता आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे काँग्रेसमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. त्‍यामुळे विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा लढवून जिंकण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्‍न सुरू झाले आहेत.

छत्रपती संभाजीनगर शहरातील तिन्ही जागांवर दावा ठोकून काँग्रेसने ठाकरे गटाला धडकी भरवली आहे. सरकार विरोधात आंदोलने, मोर्चे, काढण्याची रणनीतीही यावेळी तयार करण्यात आली. बैठकीला आमदार राजेश राठोड, शेख युसूफ, इब्राहिम पठाण, प्रकाश मुगदिया, मोहन देशमुख, भाऊसाहेब जगताप, सागर नागरे, जयप्रकाश नन्नावरे, सय्यद अक्रम, गुलाब पटेल, दीपाली मिसाळ, अनिस पटेल, मोईन ईनामदार, डॉ. नीलेश अंबेवाडीकर, रेखा राऊत, अनिता भंडारी, बबन डिडोरे पाटील, शेख रईस, डॉ. पवन डोंगरे यांची उपस्थिती होती.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विद्यापीठात केमिकल टेक्नॉलॉजी विभागात स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी

Latest News

विद्यापीठात केमिकल टेक्नॉलॉजी विभागात स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी विद्यापीठात केमिकल टेक्नॉलॉजी विभागात स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील केमिकल टेक्नॉलॉजी विभागात एम. फार्मसी अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांसाठी...
आयआरसीटीसीच्या कन्फर्म तिकिटात नाव बदलायचे कसे?
सकाळ होईपर्यंत झोप येत नाही, कूस बदलत राहता? आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं, देसी टॉनिक, येईल सुखाची झोप!
Beauty Feature : फिल्टरसारखा लूक तेही मेकअपमधून!; जाणून घ्या ब्लरिंग मेकअप, लग्नाच्या सिझनमध्ये खूप येईल कामी!!
नशेखोराचा कहर : आधी लिफ्ट मागितली, नंतर रस्‍त्‍यात गाडी थांबवून दारू पिण्यासाठी पैसे मागत १८ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण, मनपा आयुक्‍तांच्या निवासस्थानाजवळील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software