छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात संजय शिरसाट-राजू शिंदे यांच्यात चुरस!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार आ. संजय शिरसाट आणि ठाकरे गटाचे उमेदवार राजू शिंदे यांच्यात चुरशीची लढत होत आहे. या मतदारसंघात १८ उमेदवार रिंगणात असले तरी दुरंगी लढत मानली जात असून, दोघांपैकी कुणीही निवडून आले तरी शिवसेनेचा बालेकिल्ला म्‍हणून हा मतदारसंघ कायम राहणार आहे. या मतदारसंघात मराठा मतदान […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार आ. संजय शिरसाट आणि ठाकरे गटाचे उमेदवार राजू शिंदे यांच्यात चुरशीची लढत होत आहे. या मतदारसंघात १८ उमेदवार रिंगणात असले तरी दुरंगी लढत मानली जात असून, दोघांपैकी कुणीही निवडून आले तरी शिवसेनेचा बालेकिल्ला म्‍हणून हा मतदारसंघ कायम राहणार आहे. या मतदारसंघात मराठा मतदान निर्णायक भूमिका बजावणार आहे. मराठा मते कुणाला जातील, याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजू शिंदे भाजपमधून ठाकरे गटात गेले आणि उमेदवारीही मिळवली आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर उमेदवारी मिळेल या आशेने दुसऱ्या फळीतील नेते सक्रीय झाले होते. मात्र आयात उमेदवार लादल्याची भावना निष्ठावंत सैनिकांत कायम आहे. सलग तीनवेळा संजय शिरसाट या मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्‍यांच्या तुलनेत राजू शिंदे यांचा अनुभव कमी पडत असला तरी ठाकरे गटाला मिळणाऱ्या सहानुभूतीचा फायदा त्‍यांना होऊ शकतो. गेल्या पाच वर्षांत आ. शिरसाट यांची वाढलेली संपत्ती आणि मतदारसंघात १५ वर्षांत झालेल्या विकासाच्या मुद्द्यावरून शिंदे हे शिरसाटांना घेरू शकतात. या निवडणुकीत रिपाइंचे (डेमोक्रॉटिक) रमेश गायकवाड, बसपाचे कुणाल लांडगे, तर वंचित बहुजन आघाडीचे अंजन लक्ष्मण साळवे हेही रिंगणात असले तरी प्रमुख लढत शिरसाट आणि शिंदे यांच्यातच मानली जात आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software