छत्रपती संभाजीनगर पूर्वमध्ये जलील-डॉ. कादरींतील मतविभाजनामुळे सावेंचा मार्ग सोपा !

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघात भाजप उमेदवार अतुल सावे, एमआयएमचे इम्‍तियाज जलील आणि समाजवादी पार्टीचे बंडखोर उमेदवार डॉ. गफ्फार कादरी यांच्यात तिरंगी लढत रंगणार असल्याचे चित्र असले तरी, मुस्लिम मतदारांच्या विभाजनामुळे सावेंचा मार्ग सोपा झाल्‍याची चर्चा आहे. जलील आणि सावे यांच्यात चुरशीची लढत होईल, असे सुरुवातीचे चित्र होते. मात्र डॉ. गफार […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघात भाजप उमेदवार अतुल सावे, एमआयएमचे इम्‍तियाज जलील आणि समाजवादी पार्टीचे बंडखोर उमेदवार डॉ. गफ्फार कादरी यांच्यात तिरंगी लढत रंगणार असल्याचे चित्र असले तरी, मुस्लिम मतदारांच्या विभाजनामुळे सावेंचा मार्ग सोपा झाल्‍याची चर्चा आहे.

राजू वैद्य यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे हिंदुत्‍ववादी मतांचे विभाजन टळले आहे. यासाठी पुढाकार घेणाऱ्या चंद्रकांत खैरे यांचे आशीर्वाद घेताना अतुल सावे.

जलील आणि सावे यांच्यात चुरशीची लढत होईल, असे सुरुवातीचे चित्र होते. मात्र डॉ. गफार कादरी यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. सध्या पूर्व मतदारसंघात २९ उमेदवार रिंगणात आहेत. महायुती, महाविकास आघाडी, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, बसपा, समाजवादी पक्ष व अपक्ष उमेदवारांचा यात समावेश आहे. महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार राजू वैद्य यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या मतदारसंघातील हिंदुत्‍ववादी मतांचे विभाजन टळले आहे. त्‍यामुळे आता अतुल सावे हे हॅट्ट्रिक करण्यास सज्‍ज झाले आहेत. यापूर्वी ते २०१४ आणि २०१९ मध्ये याच मतदारसंघातून आमदार झालेले आहेत.

मुस्लिम मतांची विभागणी मोठी…
पूर्व मतदारसंघात लोकसभेवेळी जलील यांनी सर्वाधिक मते घेतली होती. जलील यांना ८९ हजार १४३ मते मिळाली होती. त्‍यामुळे त्‍यांचा मार्ग सुकर होता. मात्र डॉ. कादरी यांची अपक्ष उमेदवारी आणि वंचित बहुजन आघाडीनेही दिलेला मुस्लिम उमेदवार अफसर खान यांच्यामुळे मुस्लिम मते विभागली जाणार आहे. त्‍याचा लाभ अतुल सावेंना होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. २०१९ मध्ये अतुल सावे यांना ९३ हजार ९६६ मते मिळाली होती, तर त्‍यांचे प्रतिस्‍पर्धी डॉ. कादरी यांना ८० हजार ०३६ मते मिळाली होती.

हेही उमेदवार रिंगणात…
लहूजी शेवाळे (काँग्रेस), शीतल बनसोडे (बसपा), इसा यासीन(एआयएमएआयएएम), जयप्रकाश घोरपडे (पीडब्ल्यूपीआय), योगेश सुरडकर (लोकराज्य पार्टी), रवीकिरण पगारे (व्हीसीके), राहुल साबळे (एएसपी कांशीराम), साहेबखान यासीनखान (बीआरएसपी), शकिला नाजेखान पठाण (अपक्ष), तसनीम बानो (अपक्ष), दैवशाली झिने (अपक्ष), नीता भालेराव (अपक्ष), पाशू शेख (अपक्ष), मधुकर त्रिभुवन (अपक्ष), मोहम्मद मोहसीन (अपक्ष), राहूल निकम (अपक्ष), लतीफखान (अपक्ष), शहजाद खान (अपक्ष), शमीम शेख (अपक्ष), शेख अहमद (अपक्ष), सद्दाम अब्दुल अ.शेख (अपक्ष), सलीम उस्मान पटेल (अपक्ष), सोमनाथ वीर (अपक्ष), संतोष साळवे (अपक्ष), हनीफ शाह (अपक्ष).

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software