छत्रपती संभाजीनगरात पत्रकार परिषद : मराठा आरक्षणावर शरद पवारांची पुन्हा गोलमाल भूमिका!; ठोस भूमिका न घेता म्‍हणाले, सरकारने योग्य निर्णय घ्यावा…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : मराठा समाजाशी चर्चा करण्यासाठी वेगळे नेते अन्‌ ओबीसी समाजाशी चर्चा करण्यासाठी वेगळे नेते असे होऊ नये. सरकार म्हणून व्यापक चर्चा होणे गरजेचे असून, आरक्षणाबाबत समाजातील नेत्यांशी अन्‌ विरोधी पक्षांशी सुसंवाद असावा. त्यातून सरकारने योग्य निर्णय घ्यावा, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी छत्रपती संभाजीनगरात मांडली. […]

छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : मराठा समाजाशी चर्चा करण्यासाठी वेगळे नेते अन्‌ ओबीसी समाजाशी चर्चा करण्यासाठी वेगळे नेते असे होऊ नये. सरकार म्हणून व्यापक चर्चा होणे गरजेचे असून, आरक्षणाबाबत समाजातील नेत्यांशी अन्‌ विरोधी पक्षांशी सुसंवाद असावा. त्यातून सरकारने योग्य निर्णय घ्यावा, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी छत्रपती संभाजीनगरात मांडली.

दोन दिवसांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांनी आज (२७ जुलै) सकाळी पत्रकार परिषद घेतली. त्‍यावेळी त्‍यांनी आरक्षणाबाबत ठोस काही न बोलता नेहमीप्रमाणे संभ्रमावस्थेत टाकणारी भूमिका घेतल्याचे चित्र दिसून आले. आरक्षणामुळे दोन समाजांत तेढ निर्माण होणार नाही याची काळजी सरकारने घेण्याची गरज आहे, असे ते म्‍हणाले.

लोकसभा निवडणूक आमच्यापेक्षा अधिक लोकांनीच हातात घेतली होती. आता विधानसभा निवडणुकीतही तेच चित्र दिसणार असल्याचे पवार म्हणाले. लोकांना आता राज्यात बदल हवा आहे, असा दावा करत त्‍यांनी महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्ष आणि डाव्या विचारसरणीचे काही घटक पक्ष असे मिळून विधानसभा लढवणार आहेत, असे सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवारांचा उल्लेख भ्रष्टाचाराचे सरदार असा केला होता. शरद पवार हे भ्रष्टाचाऱ्यांचे सुभेदार आहेत अशी टीका देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी माझ्यावर केली. याच शहा यांना गुजरातमधून तडीपार करण्यात आले होते.

दुर्दैवाने, याच तडीपार नेत्याची हाती देशाची सुरक्षा आहे, अशी टीका यावेळी शरद पवार यांनी केली. देशाची राज्यघटना बदलण्यासाठी लोकसभेत ४०० जागा पाहिजे असे वक्तव्य कर्नाटकच्या भाजपच्या नेत्याने केले होते. नरेंद्र मोदी यांचे अनेक सहकारी हेच बोलले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांसाठी भारतीय राज्यघटना दिली. तिला वाचविण्यासाठी जनतेने भाजपला धडा शिकवला, याचा सर्वाधिक आनंद आहे. जनतेने नेहमीच सावध राहण्याची गरज आहे. अन्यथा, देशाची सत्ता हाती असलेले लोक देशाला चुकीच्या मार्गावर नेतील, असे पवार म्हणाले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software