गंगापूरमधून लढणार विधानसभा निवडणूक; आ. सतीश चव्हाण यांची मोठी घोषणा

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी गंगापूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. या मतदारसंघात सध्या भाजपचे आमदार आहेत. महायुतीत राष्ट्रवादीला (अजित पवार गट) गंगापूरची जागा सुटली नाही तरी निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. योग्य वेळी पक्षातर्फे किंवा अपक्ष म्हणून लढवण्याचाही निर्णय घेण्यात येईल, असे चव्हाण […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी गंगापूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. या मतदारसंघात सध्या भाजपचे आमदार आहेत. महायुतीत राष्ट्रवादीला (अजित पवार गट) गंगापूरची जागा सुटली नाही तरी निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

योग्य वेळी पक्षातर्फे किंवा अपक्ष म्हणून लढवण्याचाही निर्णय घेण्यात येईल, असे चव्हाण म्हणाले. देवगिरी महाविद्यालयाच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी जागतिक स्पर्धेत यश मिळविल्याची माहिती देण्यासाठी आ. चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली. दोन वर्षांपासून गंगापूरमधून विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी आ. चव्हाण करत आहेत. मात्र ही जागा महायुतीत भाजपला जाणार स्पष्ट आहे.

याबद्दल आ. चव्हाण यांना छेडले असता त्यांनी गंगापूरमधून निवडणूक लढणारच असे ठामपणे सांगितले. राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र या धोरणामुळे ग्रामीण भागातील महाविद्यालये येत्या काही वर्षांत बंद पडणार असल्याचा दावा आ. चव्हाण यांनी यावेळी करत हे धोरण मुंबई, दिल्लीसारख्या शहरांना विचारात घेऊन ठरविण्यात आल्याचा आरोप केला. ग्रामीण भागातील परिस्थितीचा या धोरणात विचारही केला नसल्याचे ते म्हणाले.

या विद्यार्थ्यांचा केला सत्‍कार…
गुगल या जागतिक कंपनीने जागतिक पातळीवर गुगल सोल्युशन चॅलेंज ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघाने जागतिक पातळीवर टॉप तीनमध्ये स्थान मिळवले आहे. याबद्दल या संघातील विद्यार्थ्यांचा सत्कार करून आ. चव्हाण यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या वेळी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष किरण आवरगावकर, महाविद्यालयाचे प्र. संचालक डॉ. सुभाष लहाने आदींची उपस्थिती होती. देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी सानिका चव्हाण, कृष्णा आवटे, मोहम्मद रेहान, शुभम पिटेकर यांनी वाया जाणाऱ्या अन्नावर ‘स्पूनशेअर ॲप’ विकसित केले आहे. ‘स्पूनशेअर ॲप’ एका क्लीकवर ३० किलोमीटर परिसरातील कार्यक्रमांची माहिती मिळते. ज्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम, समारंभ, कार्य, महाप्रसाद, विवाह सोहळे आदी ठिकाणी वाया जाणारे अन्न हे ‘ॲप’ गरजू, उपाशी लोकांपर्यंत ‘एनजीओ’च्या साह्याने पोहचवणार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software