खा. राणे म्हणाले, तुम्ही दीडदमडीचे, तुमची औकात काय, किती वेळा निवडून आलात?, संतापलेल्या प्रकाश महाजनांनी खांबेकरांच्या ‘प्रोटेक्‍शन’मध्ये क्रांती चौकात कॅमेऱ्यासमोर थोपटले दंड!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मनसे नेते प्रकाश महाजन आणि राणे पिता-पुत्रांमध्ये सध्या जुंपली आहे. नारायण राणे यांनी उलट्या करायला लावीन, अशी धमकी दिल्यानंतर महाजन हे मंगळवारी (१० जून) सकाळी ११ वाजता मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्या ‘प्रोटेक्‍शन’मध्ये क्रांती चौकात आले आणि अर्धा तास राणे पिता-पुत्रांविरुद्ध आंदोलन केले. राणे तुम्ही चुकीच्या बिळात हात घातला आहे, […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मनसे नेते प्रकाश महाजन आणि राणे पिता-पुत्रांमध्ये सध्या जुंपली आहे. नारायण राणे यांनी उलट्या करायला लावीन, अशी धमकी दिल्यानंतर महाजन हे मंगळवारी (१० जून) सकाळी ११ वाजता मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्या ‘प्रोटेक्‍शन’मध्ये क्रांती चौकात आले आणि अर्धा तास राणे पिता-पुत्रांविरुद्ध आंदोलन केले.

राणे तुम्ही चुकीच्या बिळात हात घातला आहे, मी प्रकाश महाजन आहे. तुम्‍ही मला धमक्या देता, मी कणकवलीत येईल, तुमच्या पुण्यातील बंगल्यासमोर येईन, असे म्‍हणत त्‍यांनी कॅमेऱ्यासमोर दंड थोपटले. दीर्घ काळापासून राजकीय अडगळीत पडलेले प्रकाश महाजन राणेंसोबतच्या वादामुळे अचानक चर्चेत येऊ पाहत आहेत. राज्यातील भाजप मंत्री नितेश राणे यांच्यासोबत त्यांची हमरीतुमरी सुरू आहे. नारायण राणे यांनी त्यांच्या मुलावर चांगले संस्कार करायला हवे. नितेश राणे हे व्यर्थ बडबड करतात, असा आरोप महाजन यांनी केला होता.

या आरोपानंतर खा. नारायण राणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून महाजन यांची कुवत काढली. नितेश जनतेतून तीनवेळा निवडून आला, आपण किती वेळा निवडून आला, असे म्हणत लायकीपेक्षा जास्त बोलत असल्याची टीका केली. त्‍यांची तुलना दीडदमडीच्या लोकांत केली. परत बोललात तर उलट्या करायला लावीन, असा इशारा दिला होता. त्यामुळे संतापलेल्या महाजनांनी दोन दिवसांपासून मला फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा आरोप केला आहे. धमक्यांचे कॉल आपण रेकॉर्ड करून ठेवले असून, मी डोक्यावर कफन बांधले आहे. राणे नावाच्या राजकीय गुंडाविरुद्ध लढायला मी तयार आहे, असे सांगत दंड थोपटले.

महाजनांनी आधी काढली खोड…
प्रकाश महाजन यांनी नितीन राणे यांच्यावर वैयक्‍तीक पातळीवर टीका करून या वादाला सुरुवात केली होती. नितेश राणे यांची उंची ही उभे राहिल्यावर लवंगेसारखी आणि बसल्यावर विलायचीसारखी वाटते, असे आक्षेपार्ह वक्‍तव्‍य त्‍यांनी केले होते. दरम्‍यान, आंदोलनाआधी महाजन यांची समजूत काढण्यासाठी पोलीस त्‍यांच्या घरी गेले होते. महाजन यांनी पोलिसांवरही आरोप केले. ते म्हणाले, की पोलिसांना मी सांगू इच्छितो की कोणीही पोलीस खात्‍यातले लोक माझे फोन उचलत नाहीत. उद्या जर माझा अपघात झाला, कुठे दुर्दैवी मृत्‍यू झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी नारायण राणे आणि त्‍यांच्या कार्यकर्त्यांची राहील.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software