आ. शिरसाटांसह भाजपचाही भ्रमनिरास होणार?; छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री म्हणून उदय सामंत, शंभूराज देसाईंचे नाव चर्चेत…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : खा. संदिपान भुमरे यांनी राजीनामा दिल्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी कोण विराजमान होणार, याची उत्‍सुकता सर्वांनाच लागली आहे. आ. संजय शिरसाट यांना आता तरी मंत्रिपद मिळेल, अशी आशा निर्माण झालेली असताना दुसरीकडे भाजपने पालकमंत्रीपद ताब्‍यात घेण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या. त्‍यातच आता नवीच शक्यता निर्माण झाली असून, शिंदे […]

छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : खा. संदिपान भुमरे यांनी राजीनामा दिल्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी कोण विराजमान होणार, याची उत्‍सुकता सर्वांनाच लागली आहे. आ. संजय शिरसाट यांना आता तरी मंत्रिपद मिळेल, अशी आशा निर्माण झालेली असताना दुसरीकडे भाजपने पालकमंत्रीपद ताब्‍यात घेण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या. त्‍यातच आता नवीच शक्यता निर्माण झाली असून, शिंदे गटाचे उद्योगमंत्री उदय सामंत किंवा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे दोन महिन्यांसाठी जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा भार दिला जाऊ शकतो, अशी मुंबईत चर्चा सुरू आहे.

भाजपचे मंत्री अतुल सावे यांना पालकमंत्रिपद मिळावे यासाठी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर, माजी केंद्रीय तथा राज्यसभा सदस्य राज्यमंत्री भागवत कराड, भाजप प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर मुंबईत ठाण मांडून असल्याचे सांगण्यात येते. ते आज, २७ जूनला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. दुसरीकडे शिंदे गटाचे प्रवक्ते आ. संजय शिरसाट यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडल्याचे चित्र आहे.

कारण शिंदे गटाकडून उदय सामंत किंवा शंभूराज देसाई यांच्या नावाची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या दोन महिन्यांच्या निर्णायक पालकमंत्रिपदासाठी भाजप व शिंदे गट दोन्ही पक्षांनी प्रयत्न सुरू केले आहेत. छत्रपती संभाजीनगरला संदिपान भुमरे यांचा अपवाद वगळला तर आजवर कायम बाहेरचेच पालकमंत्री मिळत आले आहेत. सुभाष देसाई, काही काळ एकनाथ शिंदे पालकमंत्री राहिले आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software