आ. शिरसाटपुत्राच्या कारवर दगडफेक, गोलवाडी फाट्याजवळील घटना, राजू शिंदे म्‍हणाले, CID चौकशी करा…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आ. संजय शिरसाट यांचे पूत्र सिद्धांत गोलवाडी फाट्यावरून लिंक रोडकडील फार्महाऊसवर जात असताना त्‍यांच्या कारवर दगडफेक झाली. ही घटना मंगळवारी (१९ नोव्‍हेंबर) रात्री अकराच्या सुमारास घडली. सातारा पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार देण्यात आली आहे. दगडफेकीच्या घटनेची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे उमेदवार राजू शिंदे यांनी केली आहे. आमदार […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आ. संजय शिरसाट यांचे पूत्र सिद्धांत गोलवाडी फाट्यावरून लिंक रोडकडील फार्महाऊसवर जात असताना त्‍यांच्या कारवर दगडफेक झाली. ही घटना मंगळवारी (१९ नोव्‍हेंबर) रात्री अकराच्या सुमारास घडली. सातारा पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार देण्यात आली आहे. दगडफेकीच्या घटनेची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे उमेदवार राजू शिंदे यांनी केली आहे.

आमदार नावाने स्टिकर लावलेल्या कारमधून सिद्धांत शिरसाट हे चार-पाच कार्यकर्त्यांसह जात होते. अचानक त्‍यांच्यावर कारवर मोठा दगड येऊन आदळला. त्‍यानंतर आणखी दगडे फेकण्यात आली. पोलिसांनी घटनास्‍थळाची पाहणी केली आहे. या घटनेबाबत शिंदे गटाचे उमेदवार आ. संजय शिरसाट म्‍हणाले, की आपण ३ निवडणुका लढलो. पण असा प्रकार झाला नाही. नाशिक, नगर, पुण्यातील काही लोक शहरात दहशत पसरवत आहेत. या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी त्‍यांनी केली. तर ही घटना गंभीर असून त्याची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी राजू शिंदे यांनी केली.

सिद्धांत शिरसाट यांनी पत्रकारांना सांगितले, की आमच्या वाहनामागे सहा दुचाकी आणि दोन कार आल्या. त्यांनी अगोदर अडवून मला कुठे चालले, अशी विचारणा केली. काही कळण्याच्या आत पुन्हा परत येऊन दुचाकीवरील सहा जणांनी दगडफेक सुरू केली. यात माझ्या मित्राला किरकोळ दुखापत झाली आहे. आ. शिरसाट म्हणाले, की ज्या पद्धतीने सध्या गुंडगिरी, धमकावणे सुरू आहे. असे मी यापूर्वी कधीही पाहिले नाही. हा प्रकार इतका वाढलाय की आज माझ्या मुलाच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली.

दगड एवढा मोठा आहे की, एखाद्याचा यात जागीच मृत्यू झाला असता. मी पोलीस आयुक्‍तांनाही सांगितले होते, की पुणे, नगर आणि नाशिकचे काही लोक शहरात फिरत आहेत. दोन दिवसांपूर्वी माझ्या पत्नीच्या गाडीचाही अज्ञातांकडून पाठलाग करण्यात आला होता. पोलीस उपायुक्‍त नवनीत काँवत म्हणाले, की घटनेची माहिती मिळताच मी आणि सातारा पोलीस घटनास्थळी आलो. सिद्धांत शिरसाट यांच्या मित्राला पाठीवर दगड लागल्याने किरकोळ दुखापत झाली आहे. हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. लवकर त्यांना पकडण्यात येईल.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software