आ. कडूंचा संयम सुटला, अधिकाऱ्याचा गाल सुजवला!, सुभेदारी विश्रामगृहातील धक्कादायक प्रकाराने खळबळ

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सुभेदारी विश्रामगृहात गुरुवारी (८ ऑगस्ट) सायंकाळी पाचच्या सुमारास विचित्रच प्रकार घडला. आ. बच्चू कडू यांचा नेहमीप्रमाणे तोल ढळला अन्‌ त्‍यांनी थेट अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली. दिव्यांगांना निकृष्ट दर्जाच्या ई-रिक्षा दिल्याबद्दल जाब विचारताना कडूंनी इतका आक्रमकपणा धारण केला की, अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सुभेदारी विश्रामगृहात गुरुवारी (८ ऑगस्ट) सायंकाळी पाचच्या सुमारास विचित्रच प्रकार घडला. आ. बच्चू कडू यांचा नेहमीप्रमाणे तोल ढळला अन्‌ त्‍यांनी थेट अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली. दिव्यांगांना निकृष्ट दर्जाच्या ई-रिक्षा दिल्याबद्दल जाब विचारताना कडूंनी इतका आक्रमकपणा धारण केला की, अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही लोकांच्या मते, कामचुकार अधिकाऱ्यांनाच असाच धडा शिकवला पाहिजेत, तर दुसऱ्या बाजूच्या लोकांनी कडू यांचे हे वर्तन हुकूमशाही स्वरुपाचे असल्याचे मत व्यक्‍त केले आहे. अधिकाऱ्यांना अशाप्रकारे मारहाण करणे असमर्थनीय असल्याचे काहींचे म्‍हणणे आहे.

नक्की काय झाले?
दिव्यांग, शेतकरी, कामगारांच्या मागण्यांसाठी आ. बच्‍चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी क्रांती चौक ते विभागीय आयुक्‍तालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाच्या नियोजनासाठी गुरुवारी आ. कडू छत्रपती संभाजीनगरात दाखल झाले. सुभेदारी विश्रामगृहात ते कार्यकर्त्यांशी चर्चा करत असताना दिव्यांगांसाठी मोफत वाटलेल्या ई-रिक्षांत तांत्रिक अडचणी येत असल्याची तक्रार काहींनी मांडली. एकाने ती ई-रिक्षाही आणली व सांगितले, की या रिक्षात दोनच प्रवासी बसतात. ती पुलावरही चढू शकत नाही. यावेळी ५०० पैकी केवळ २५० रिक्षांचेच वाटप झाल्याचीही तक्रार करण्यात आली. कडू यांनी लगेचच संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. अधिकाऱ्याला जाब विचारताना आ. कडू यांनी संतापात अधिकाऱ्याच्या सणसणीत कानशिलात लगावली. त्‍यामुळे सर्वच अधिकारी बिथरले. दिव्यांगाची गैरसोय सहन करणार नाही, असा इशारा कडू यांनी अधिकाऱ्यांना दिला. दरम्‍यान, दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभय करगुटकर यांनी सांगितले, की ई-रिक्षाबद्दल तांत्रिक अडचणींच्या तक्रारी आल्या आहेत. चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्‍यांनी सांगितले.

बच्‍चू कडूंविरुद्ध कडक कारवाई गरजेची…
दरम्‍यान, यापूर्वीही अनेकदा आ. कडू यांनी कायदा हातात घेऊन अधिकाऱ्यांना मारहाण केली आहे. मात्र सत्तेत असल्याने त्‍यांच्यावर ठोस कारवाई होत नाही. आताही त्‍यांनी थेट अधिकाऱ्याला कानशिलात लगावल्याची घटना घडल्याने सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांत संताप निर्माण झाला आहे. कडूंविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software