अर्थसंकल्पाविरोधात शरद पवार गटाची क्रांती चौकात निदर्शने

On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हा व शहर शाखेतर्फे बुधवारी (२३ जुलै) क्रांती चौकात अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त करत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. अर्थसंकल्पात एकच दोष, महाराष्ट्र रोष, महाराष्ट्र रोष… अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आंदोलनात जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, अभिषेक देशमुख, वीणा खरे, मोतीलाल […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हा व शहर शाखेतर्फे बुधवारी (२३ जुलै) क्रांती चौकात अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त करत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. अर्थसंकल्पात एकच दोष, महाराष्ट्र रोष, महाराष्ट्र रोष… अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

आंदोलनात जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, अभिषेक देशमुख, वीणा खरे, मोतीलाल जगताप, सुरेश आहेर, रवी तांगडे पाटील, विठ्ठल जाधव, राजेश मोरे, रघुनाथ पाटील, राजू बापू साळुंखे, मंजाहरी गाडे पाटील, डॉ. ज्ञानेश्वर नीळ, रज्जाक पठाण, राहुल ताठे, सलमा बानो, धनश्री तडवळकर, गजाला जमादार, लीला मगरे, प्राप्ती वैष्णव आदींनी भाग घेतला. केंद्र सरकारला महाराष्ट्रातून कमी जागा मिळाल्यामुळे त्याचा परिणाम अर्थसंकल्पात दिसल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला. इतर राज्यांना दिलेल्या मदतीवर नजर टाकल्यास आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्राला अर्थसंकल्पातून काहीही मिळालेले नाही. महाराष्ट्रातील जनता स्वाभिमानी असून, असा अन्याय सहन करणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरात महिनाभरात आढळले ८ मृतदेह, ज्यांची ओळख पटली नाही, अशा अवस्थेत होते, की तुम्ही बघूही शकणार नाही...

Latest News

छत्रपती संभाजीनगरात महिनाभरात आढळले ८ मृतदेह, ज्यांची ओळख पटली नाही, अशा अवस्थेत होते, की तुम्ही बघूही शकणार नाही... छत्रपती संभाजीनगरात महिनाभरात आढळले ८ मृतदेह, ज्यांची ओळख पटली नाही, अशा अवस्थेत होते, की तुम्ही बघूही शकणार नाही...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगर शहरात अनोळखी मृतदेह मिळून येण्याचे प्रमाण लक्षणीय ठरत आहे. १ ऑक्‍टोबरपासून...
सामाजिक कार्यकर्तीच्या फेसबुक पोस्टवर अश्लील शिवीगाळीचा भडीमार, पोलिसांनी २३ जणांविरुद्ध केला गुन्हा दाखल, छत्रपती संभाजीनगरातील प्रकार
लई हुशारी केली, पण शेवटी घडा भरलाच!; ‘कायद्या’चा गैरवापर करून लाखो रुपये उकळले, अखेर दुकलीला आता पडल्या बेड्या!!, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण सायबर पोलिसांची कामगिरी, नक्की काय आहे स्टोरी वाचूया... 
मंजूरपुऱ्यातील ‘बॉस पब्लीक चॉईस’ रेडिमेड कपड्यांचे दुकान फोडले, चोरट्यांनी शर्ट-पँट नेले...
गोमटेश मार्केटमध्ये भल्ला चाट भंडारसमोर तरुणांमध्ये हाणामारी!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software