अब्‍दुल सत्तारांना तुरुंगात टाकू; उद्धव ठाकरे यांची सिल्लोडमधील जाहीर सभेत घोषणा

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : अब्‍दुल सत्तार यांनी जमिनी बळकावल्या, भूखंड लाटले. शासकीय मालमत्तांचा दुरुपयोग केला. सत्ता आल्यास त्‍यांना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तारांच्या पराभवासोबत सोबत येण्याचे आवाहन भाजपच्या कार्यकर्त्यांना केले. सिल्लोडमधील भाजपच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो. मतभेद असतील तर दूर करून सत्तार यांच्या पराभवासाठी प्रयत्‍न करा, […]

सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : अब्‍दुल सत्तार यांनी जमिनी बळकावल्या, भूखंड लाटले. शासकीय मालमत्तांचा दुरुपयोग केला. सत्ता आल्यास त्‍यांना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तारांच्या पराभवासोबत सोबत येण्याचे आवाहन भाजपच्या कार्यकर्त्यांना केले. सिल्लोडमधील भाजपच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो. मतभेद असतील तर दूर करून सत्तार यांच्या पराभवासाठी प्रयत्‍न करा, असे ठाकरे म्‍हणाले. राज्‍यभरात भाजप ठाकरेंचा शत्रू असला तरी सिल्लोडमध्ये मित्र म्‍हणून त्‍याला सोबत घेण्याच्या ठाकरेंच्या वक्‍तव्‍याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार सुरेश बनकर यांच्या प्रचारार्थ सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. सभेला मोठा जनसमुदाय लोटला होता. आ. अंबादास दानवे, काँग्रेसचे जालन्याचे खासदार कल्याण काळे, मिलिंद नार्वेकर, अनिल पटेल, द्वारकादास पाथ्रीकर, रंगनाथ काळे, उमेदवार सुरेश बनकर, सय्यद अनिस, प्रा. राहुल ताठे, दत्ता पांढरे, तालुकाप्रमुख रघुनाथ घरमोडे, रघुनाथ चव्हाण, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्कर घायवाट, सुनील मिरकर, वृषाली मिरकर, मनोज अण्णा मोरेल्लू, अशोक तायडे, शेख फेरोज, कैसर आझाद, महेश शंकरपेल्ली आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

उद्धव ठाकरे म्‍हणाले, की मी अब्दुल सत्तार यांना २०१९ मध्ये उमेदवारी दिली होती. ही माझी चूक झाली, मी माफी मागतो. अशा गद्दारांना आता त्यांची जागा दाखवा आणि सुरेश बनकर यांना निवडून द्या. सर्वसामान्य माणसे सिल्लोडमध्ये एकवटली आहेत. त्यामुळे ही संधी यंदा दवडू नका. सिल्लोडमधील गुंडगिरी, दडपशाही रोखण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनीही साथ द्यावी. मतभेद असले तरी त्यांच्याशी बोलायला तयार आहे, असे आवाहन त्‍यांनी केले. सोयाबीनला ७ हजार आणि लाडक्या बहिणीला महिन्याला ३ हजार रुपये देऊ, असे आश्वासनही ठाकरे यांनी दिले.

ठाकरे म्‍हणाले…
-आज सगळ्या यंत्रणा भाजप व महायुतीच्या ताब्यात आहेत. पण आज मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटले. कारण, हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर आज माझी बॅगच कुणी तपासली नाही. माझे महत्त्व एवढे कमी झाले की काय? सभेला जमलेल्या गर्दीवरूनही भविष्यातील विजयाची शाश्वती मिळत आहे.
-आम्हाला माणसे आणावी लागत नाहीत. कारण आपल्याकडे सर्व माणसे जिवाभावाची आहेत. आम्ही येथील एकाही माणसाला भाड्याने आणले नाही. हे सर्वजण मनातून आलेत. या सिल्लोडमधील गुंडागर्दी, दडपशाही, हुकूमशाही गाडून टाकण्यासाठी व जाळून टाकण्यासाठी हे लोक आलेत.

-जनता एकवटली तर कुणी कितीही मोठा असला तरी तो कोलमडून पडल्याशिवाय राहत नाही, हा इतिहास आहे. त्यामुळे मी भाजपच्या लोकांनीही सिल्लोड येथील गुंडागर्दी घालवून देण्याची ही संधी सोडू नये. भाजपचा सच्चा कार्यकर्ता ही गुंडागर्दी मोडून काढल्याशिवाय राहणार नाही हे मला माहिती आहे. आपण सर्वजण एकत्र येऊन गुंडागर्दी मोडून काढूया.
-मी जे करता येते, तेच बोलतो. पण एकदा तुम्ही या येथील गद्दाराला पाडा, पाडा नाही तर थेट गाडाच. कारण आता याच्या पापाचा घडा भरला आहे. त्याची चौकशी करून त्याला तुरुंगात डांबल्याशिवाय, येथील जनतेला भयमुक्त केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असे वचन मी देतो. तुम्ही तुमचे आयुष्य, तुमच्या मुलाबाळांचे आयुष्य, त्यांचे भविष्य हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या हातात देणार आहात की तुमच्यावर दादागिरी करणाऱ्या गद्दाराच्या हातात देणार आहात हे ठरवा. मी सांगण्याचे काम केले. उत्तर तुम्ही द्यायचे आहे. वैजापूरमध्येही उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटाचे उमेदवार दिनेश परदेशी यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. त्‍याही सभेला मोठा प्रतिसाद मिळाला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software