अंबादास दानवेंच्या PA कडून महिला तहसीलदारांना वारंवार कॉल करून त्रास?, नक्की काय आहे भानगड वाचूया…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

मुंबई (सीएससीएन वृत्तसेवा) : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या ‘पीए’ने मोबाइलवर कॉल महिला तहसीदारांचा छळ केल्याचा कथित प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यातील गौण खनिज भरारी पथकप्रमुख, महिला तहसीलदार ज्योती देवरे आणि पीए यांच्यातील संवादाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. देवरे यांच्याविरुद्ध विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधी सूचना लावल्यानंतर त्यांच्याशी रामटेके नामक ‘पीए’ने […]

मुंबई (सीएससीएन वृत्तसेवा) : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या ‘पीए’ने मोबाइलवर कॉल महिला तहसीदारांचा छळ केल्याचा कथित प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यातील गौण खनिज भरारी पथकप्रमुख, महिला तहसीलदार ज्योती देवरे आणि पीए यांच्यातील संवादाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. देवरे यांच्याविरुद्ध विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधी सूचना लावल्यानंतर त्यांच्याशी रामटेके नामक ‘पीए’ने वारंवार संपर्क साधला. त्यामुळे वैतागून ‘तुम्ही त्रास देत आहात म्हणूनच मी राजीनामा दिल्याचे सांगेन’ असे देवरे म्हणत आहेत.

या कथित ऑडिओ क्लिपमध्ये रामटेके यांना देवरे म्हणाल्या, की ‘अहो, थोडी तरी लाज ठेवा. तुम्हाला पण बहीण असेल. तीही कुठेतरी नोकरी करत असावी याचासुद्धा जरा विचार करा… पात्र नसतानाही जिल्हा गौण खनिज अधिकारी पदावर आहे. तुमची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी झाली पाहिजे. तुम्ही प्रचंड भ्रष्टाचार करत आहात, असे खोटे आरोप आपल्यावर लावल्याचे देवरे यांचे म्हणणे आहे. मात्र लक्षवेधीच्या मसुद्यात दानवेंचे नाव नसल्याने मी सावध झाले. कारण याआधीही एमआयडीसीत माझा कोणताही संबंध नसतानाही माझ्याविरुद्ध लक्षवेधी दाखल करण्यात आली होती, असे देवरे यांनी म्हटले आहे.

याबाबत आ. अंबादास दानवे यांनी खुलासा केला असून, देवरे म्हणतात तशी कोणतीही लक्षवेधी आपण विधिमंडळ कार्यालयाला पाठवलेली नाही. त्यामुळे तहसीलदारांनी केलेले आरोप विरोधी पक्षनेते व त्यांच्या कार्यालयाची बदनामी करणारे आहेत, असे ते म्हणाले. यासंदर्भातील वृत्त आजच्या अंकात एका प्रसिद्ध दैनिकाने दिले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software