SILLOD CRIME STORY : ‘प्रिय आश्विनी तुझ्यावर खूप प्रेम करत होतो, करतच राहणार…’ वाममार्गाला लागलेल्या पत्‍नीला चंद्रशेखरने लिहिले होते शेवटचे पत्र!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (क्राईम रिपोर्टर : सीएससीएन वृत्तसेवा) : ”प्रिय आश्विनी मी तुझ्यावर खूप प्रेम करत होतो आणि करतच राहणार… तुला एवढा जीव लावणारा दुसरा कदाचितच भेटेल. मी तुला सांगू इच्छितो, मी तुझ्या अनेक चुका माझ्या पदरात टाकून घरच्यांचे बोलणे सहन केले. तुझ्यासाठी थंडीतही दिवस काढले. तरीसुद्धा तुझ्या माझ्यावर विश्वास बसला नाही. तुला मी आणि विष्णू भाऊ […]

सिल्लोड (क्राईम रिपोर्टर : सीएससीएन वृत्तसेवा) : ”प्रिय आश्विनी मी तुझ्यावर खूप प्रेम करत होतो आणि करतच राहणार… तुला एवढा जीव लावणारा दुसरा कदाचितच भेटेल. मी तुला सांगू इच्छितो, मी तुझ्या अनेक चुका माझ्या पदरात टाकून घरच्यांचे बोलणे सहन केले. तुझ्यासाठी थंडीतही दिवस काढले. तरीसुद्धा तुझ्या माझ्यावर विश्वास बसला नाही. तुला मी आणि विष्णू भाऊ दोघांनी किती बिकट परिस्थितीत हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हे तर तुला माहीत आहेच. तुझे हातपाय वाकडे व्हायचे. हे मला सांगायची गरज नाही कधी वेळ मिळाला तर तुझ्या होणाऱ्या नवऱ्या ही गोष्ट सांग”… अशी हृदयस्पर्शी चिठ्ठी पत्‍नीला लिहून चंद्रशेखर मनोहर सोनवणे (वय ३४, रा. रेलगाव ता. सिल्लोड) याने जांभई रोडवरील किशोर राजहंस यांच्या शेतातील बाभळीच्या झाडाला मंगळवारी (२८ जानेवारी) सकाळी फाशी घेतली…

चंद्रशेखर हा त्याची पत्नी लक्ष्मी (वय २२) व मुलगा अजय (वय ६) यांच्यासह राहत होता. पत्नी लक्ष्मीबाई ही त्‍याला व मुलाला सोडून गेली म्हणून तो काही दिवसांपासून तणावात राहत होता. पत्नी परत येत नाही म्हणून जीवन जगावे वाटत नाही. आत्महत्या करावी वाटते असे म्हणायचा. त्‍यावर नातेवाइक त्‍याला समजावून सांगत होते…

वासनेने पेटलेल्या लक्ष्मीने घेतला चंद्रशेखरचा बळी…
चंद्रशेखर व त्‍याची पत्‍नी लक्ष्मीबाई उर्फ आश्विनी हे दाम्‍पत्‍य गावातील मनिषा गणेश मेहेंदुले हिच्यासोबत अंकुश लक्ष्मण भागवते याच्या गाडीने बाहेरगावात शेतीकामासाठी, अद्रक खोदण्यासाठी जात होते. तेव्हा मनिषा व अंकुश भागवते हे लक्ष्मीला मनिषाचा भाऊ मनोज रामसिंग मुंढे (रा. अंभई ता. सिल्लोड) याच्यासोबत रहा… तू सुखात राहशील, तुला काही कमी पडणार नाही, असे बोलून मोहात पाडत होते. मनोज मुंढे याच्याकडे जाण्यासाठी ते प्रवृत्त करायचे. त्यांच्या बोलण्यामुळे लक्ष्मीबाईसुद्धा मनोजकडे आकर्षित झाली आणि त्याच्यासोबत राहण्यासाठी २२ जानेवारी २०२५ रोजी निघून गेली. लक्ष्मी अचानक गायब झाल्याने बराच शोध घेतल्यानंतर चंद्रशेखरने पत्नी हरवल्याची तक्रार सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी लक्ष्मीचा शोध घेतला असता २७ जानेवारीला ती मनोजसोबत मिळून आली. लक्ष्मीने पोलिसांना जबाब देताना मला पतीसोबत राहायचे नाही. माझ्या मर्जीने प्रियकरासोबत जात आहे, असे सांगितले. ते ऐकून चंद्रशेखर हादरून गेला होता.

पहाटे फासावर लटकलेला दिसला…
जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिने दिलेला धक्का चंद्रशेखर पचवणे शक्यच नव्हते. मंगळवारी (२८ जानेवारी) सकाळी सहाला अंकुश भागवते हा बटाईने करत असलेल्या जांभई रोडवरील गट क्रमांक २४९ मधील किशोर राजहंस यांच्या शेतातील बाभळीच्या झाडाला चंद्रशेखरने फाशी घेतल्याचे दिसून आले. गावातील लोक जमले. प्लास्टिकच्या ठिबक नळीने फाशी घेऊन लटकलेल्या अवस्थेतील चंद्रशेखरला पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने फासावरून काढले. सिल्लोडच्या सरकारी रुग्णालयात आणले असता डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. चंद्रशेखरच्या पॅन्टच्या खिशात काही कागदी चिठ्ठ्या सापडल्या. त्यात त्याने पत्‍नीवर करत असलेल्या प्रेमाचा उल्लेख आहे. अंकुश भागवते, मनिषा मेहेंदुले, मनोज मुंढे अशी लोकांची नावेही चिठ्ठीत होती. रेलगाव येथे चंद्रशेखरवर अंत्यविधी केल्यानंतर सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात योगेश पांडुरंग सुरडकर (चंद्रशेखरचा आतेभाऊ, वय २८, हॉटेल चालक, रा. रेलगाव) यांनी तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी लक्ष्मीबाई, मनिषाबाई गणेश मेहेंदुले, अंकुश लक्ष्मण भागवते (तिघे रा. रेलगाव), मनोज रामसिंग मुंढे (रा. अंभई ता. सिल्लोड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक लहू घोडे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

"हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!!

Latest News

"हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!! "हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!!
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील रहिवासी सकिना ठाकूर हिने कमालच केली आहे. तिने रूढीवादी विचारसरणीला आव्हान आणि ग्रामीण उद्योजकतेचे एक नवीन...
एफआयआर किंवा कोर्ट केस होऊनही सरकारी नोकरी मिळू शकते का? नियम काय म्हणतात...
स्किन राहील तरुण, सुरकुत्या होतील नाहीशा, घरगुती क्रीम बनवा अन्‌ २ आठवड्यात पहा कमाल!
चार मानवी दोष, जे एखाद्याला यशाच्या मार्गापासून नेतात दूर...
अहंकार अन्‌ निष्काळजीपणामुळेच नंतर माझे चित्रपट चालले नाहीत...; प्रसिद्ध निर्माते-दिग्ददर्शक रामगोपाल वर्मा यांची विशेष मुलाखत
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software