- News
- एक्सक्लुझिव्ह
- BIG STORY : अट्टल गुन्हेगाराचे बुलडाण्याच्या १७ वर्षीय मुलीवर प्रेमजाळे, छ. संभाजीनगरातून कारमधून अप...
BIG STORY : अट्टल गुन्हेगाराचे बुलडाण्याच्या १७ वर्षीय मुलीवर प्रेमजाळे, छ. संभाजीनगरातून कारमधून अपहरण, लोकेशन मिळताच अकोला पोलिसांची तत्परता, सिनेस्टाइल पाठलाग, अखेर कारसमोर पोलीस वाहन आडवे लावून पकडले!
छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : बुलडाण्याच्या १७ वर्षे १० महिने वय व बीएस्सी फर्स्ट इयरला असलेल्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून छत्रपती संभाजीनगरातील मुकुंदवाडी बसथांब्यावरून टाटा नेक्सन कारमधून कुख्यात गुन्हेगाराने पळवले होते. तिला अकोल्याला आणत असताना डाबकी रोड पोलिसांनी अकोला शहरातील एसबीआय बँकेसमोर नाकेबंदी केली. गुन्हेगाराच्या कारचा सिनेस्टाइल पाठलाग करून कारसमोर पोलीस व्हॅन […]
छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : बुलडाण्याच्या १७ वर्षे १० महिने वय व बीएस्सी फर्स्ट इयरला असलेल्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून छत्रपती संभाजीनगरातील मुकुंदवाडी बसथांब्यावरून टाटा नेक्सन कारमधून कुख्यात गुन्हेगाराने पळवले होते. तिला अकोल्याला आणत असताना डाबकी रोड पोलिसांनी अकोला शहरातील एसबीआय बँकेसमोर नाकेबंदी केली. गुन्हेगाराच्या कारचा सिनेस्टाइल पाठलाग करून कारसमोर पोलीस व्हॅन आडवी लावली. कार पोलीस व्हॅनला धडकली. पोलिसांनी गुन्हेगाराच्या मुसक्या आवळून मुलीची सुटका केली आहे.
२६ फेब्रुवारीला महाशिवरात्रीनिमित्त अकोला पोलीस दल बंदोबस्तात होते. डाबकी रोड पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक संजय पहुरकर यांचे पथक गस्तीवर असताना त्यांना डायल ११२ वर कॉल आला, की निंबा- अकोला रोडवर एमएच २८ बीक्यू ९३३७ नंबर असलेल्या कारमध्ये मुलीचे अपहरण करून एक गुन्हेगार घेऊन जात आहे. पहूरकर हे तातडीने लोकेशनच्या ठिकाणी डाबकी बसथांब्यावर आले असता अमितची कार त्यांना भरधाव जाताना दिसली. पहूरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लगेचच कारचा पाठलाग सुरू केला. त्याला गाडीचा हॉर्न देऊन थांबण्याचा इशारा करत होते. महाशिवरात्री उत्सव असल्याने रस्त्याने भाविकांची गर्दी डाबकी रोडने होती. अमित या गर्दीचा फायदा उचलून थांबत नव्हता. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनीही संयमाने घेतले. पोलिसांनी आपली गाडी वेगाने पुढे नेऊन त्याच्या कारच्या बरोबरीने घेत थांबण्याचा इशारा केला. पण त्याने वेग अधिकच वाढवला.
पहूरकर यांनी पोलीस ठाण्यात कॉल करून आणखी एका टीमला एसबीआय बँकेसमोर नाकेबंदी करायला सांगितली. पोलिसांच्या दुसऱ्या टीमने काही मिनिटांत एसबीआय बँकेसमोर नाकेबंदी केली. अमितने नाकेबंदी पाहूनही वेग कमी न करता एसबीआय बँकेसमोर एका मोटारसायकलला धडक दिली. त्यामुळे कुठला अनर्थ होऊ नये म्हणून पोलिसांनी आपले वाहन त्याच्या कारसमोर सिनेस्टाइल आडवे लावले व तातडीने पोलीस वाहनातून उतरले. त्याने पोलिसांच्या वाहनाला उडवले. यात पोलिसांच्या शासकीय वाहनाचे (एमएच ३०, बीबी ३५९४) मोठे नुकसान झाले. नंतर त्याची कार बंद पडली. तातडीने पोलिसांनी अमितला कारबाहेर काढून ताब्यात घेतले. मुलीला सुरक्षित ताब्यात घेऊन तिची सुटका करण्यात आली. कारवाईची माहिती मुलीच्या पालकांना देण्यात आली. त्यानंतर ते अकोला येथे आले. त्यांच्या ताब्यात मुलीला देण्यात आले. अमितला अटक केल्याची माहिती डाबकी रोड पोलिसांनी मुकुंदवाडी पोलिसांना दिली. तातडीने मुकुंदवाडी पोलिसांचे पथक अकोल्याला गेले आणि अमितला ताब्यात घेतले.

