मराठा आरक्षण : आजवर १८ जणांच्या आत्‍महत्‍या, १३ जणांना शासनाकडून १० लाख, ५ जणांचे प्रस्ताव शासनाकडे, लाडसावंगीच्या पडूळ यांचाही प्रस्ताव लगेचच पाठवला…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मनोज जरांगे पाटील यांच्या आक्रमक भूमिकेनंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न अधिकच ऐरणीवर आला आहे. समाजही या प्रश्नाला घेऊन संवेदनशील झाला असून, काही जण टोकाचे पाऊल उचलत आहेत. यातूनच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आजवर १८ जणांनी आत्‍महत्‍या केली आहे. शासनाने यातील १३ जणांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी १० लाख याप्रमाणे १ कोटी […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मनोज जरांगे पाटील यांच्या आक्रमक भूमिकेनंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न अधिकच ऐरणीवर आला आहे. समाजही या प्रश्नाला घेऊन संवेदनशील झाला असून, काही जण टोकाचे पाऊल उचलत आहेत. यातूनच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आजवर १८ जणांनी आत्‍महत्‍या केली आहे. शासनाने यातील १३ जणांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी १० लाख याप्रमाणे १ कोटी ३० लाख रुपयांची आर्थिक मदत पुरवली आहे. ५ जणांचे प्रस्ताव शासनाकडे प्रस्ताव पाठवलेले असून, ते प्रक्रियेत आहेत. लाडसावंगी (ता. छत्रपती संभाजीनगर) येथील बाबासाहेब जनार्धन पडूळ यांच्या वारसांना आर्थिक मदतीचा प्रस्तावही जिल्हा प्रशासनाने गुरुवारीच शासनाकडेच पाठवला आहे. आंदोलनात जखमी झालेल्या २२ जणांवर उपचाराच्या खर्चापोटी शासनाला रुग्णालयाला २५ लाख २३ हजार ३७५ बिल अदा करावे लागले आहे.

आजवर यांना मिळाली मदत…
शुभम अशोक गाडेकर, कोलठाण, ता. छत्रपती संभाजीनगर
बाळू नारायण भोकरे, धामणगाव, ता. फुलंब्री
गणेश काकासाहेब कुबेर, आपतगाव, ता. छत्रपती संभाजीनगर
उद्धव तुळशीराम कुबेर, गेवराई कुबेर, ता. छत्रपती संभाजीनगर
सुरेश सोनवणे, देवगाव, ता. कन्‍नड
नानासाहेब आप्पासाहेब पवार, रा. पिंपळखुटा
संदीप लक्ष्मण बोराडे, पिसादेवी, ता. छत्रपती संभाजीनगर
गणेश काकासाहेब जंगले, चिंचोली नकीब, ता. फुलंब्री
विजय पुंडलीक राकडे, खामगाव, ता. फुलंब्री
ज्ञानेश्वर शिवाजी मोहारे, वारेगाव, ता. फुलंब्री
गजानन जाधव, गणोरी, ता. फुलंब्री

यांचे प्रस्ताव शासनाकडे…
पैठण येथील आदित्य संजय जाधव, आपेगाव येथील सोपान भागवतराव औटे, फुलंब्री तालुक्यातील जळगाव मेटे येथील भिमराव भिका पाचपुते, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पिसादेवी येथील दादाराव शंकर सपकाळ, लाडसावंगी येथील बाबासाहेब जनार्दन पडूळ यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याबाबत निधीची मागणी करणारे प्रस्ताव शासनाकडे प्रशासनाने पाठवले आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software