- News
- एक्सक्लुझिव्ह
- नक्की काय घडलं : महिला वाहकाने आधी प्रवाशाच्या कानशिलात वाजवली, नंतर बसमध्येच दोघांत झाली हाणामारी!;...
नक्की काय घडलं : महिला वाहकाने आधी प्रवाशाच्या कानशिलात वाजवली, नंतर बसमध्येच दोघांत झाली हाणामारी!; विद्यार्थ्यांना बसमध्ये घेण्यास नकार दिल्याने वादाला सुरुवात…
पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : एसटी महामंडळाची बस आपलीच जहॉगिरी असल्याच्या अविर्भावात काही वाहक वावरत असतात. याचाच प्रत्यय पाचोडमध्ये आला. विद्यार्थ्यांना बसमध्ये घेण्यास नकार देणाऱ्या महिला वाहकाला प्रवाशाने जाब विचारला असता महिला वाहकाने वाद घालून प्रवाशाच्या कानशिलात वाजवली… त्यामुळे प्रवाशाच्या संतापाचा कडेलोट झाला आणि महिला वाहकासोबत त्याची हाणामारी झाली. ही घटना मंगळवारी (९ जुलै) सकाळी साडेनऊच्या […]
पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : एसटी महामंडळाची बस आपलीच जहॉगिरी असल्याच्या अविर्भावात काही वाहक वावरत असतात. याचाच प्रत्यय पाचोडमध्ये आला. विद्यार्थ्यांना बसमध्ये घेण्यास नकार देणाऱ्या महिला वाहकाला प्रवाशाने जाब विचारला असता महिला वाहकाने वाद घालून प्रवाशाच्या कानशिलात वाजवली… त्यामुळे प्रवाशाच्या संतापाचा कडेलोट झाला आणि महिला वाहकासोबत त्याची हाणामारी झाली. ही घटना मंगळवारी (९ जुलै) सकाळी साडेनऊच्या सुमारास पाचोड येथील बसस्थानकात घडली. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, अशा कटू घटना टाळण्यासाठी चालक-वाहकांना सभ्य वर्तनाच्या सूचना कराव्यात आणि प्रवाशांच्या सेवेसाठी आपण असल्याची जाणीव करून द्यावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या प्रकरणात स्वतःची आधी चूक असूनही महिला वाहकाने पाचोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी प्रवाशाविरुद्ध सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे.
पाचोड बसस्थानक महत्त्वाचे असून, येथून दररोजतीनशे ते साडेतीनशेच्या जवळपास एसटी बसेस ये-जा करीत असतात. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर झाल्यापासून एसटी महामंडळाच्या बसेस गावाचे थांबे घेत नसल्याच्या तक्रारी आहेत. आडूळला थांबा असूनही एसटी बसेस बायपासने निघून जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होतात. ज्या बसमध्ये महिला वाहक होती, ती लांब पल्ल्याची नव्हती. तरीही आडूळचा थांबा घेणार नसल्याचे सांगत प्रवाशांना उतरून जायला त्या सांगत होत्या, हे विशेष. एसटी महामंडळाच्या धोरणालाच हरताळ फासण्याचे काम महिला वाहकाने केल्याच्या प्रतिक्रिया पाचोडमध्ये उमटल्या. त्यामुळेच ही कटू घडल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.

