काय सांगता… छत्रपती संभाजीनगरात चक्क आयव्हीएफ तंत्रज्ञानाने जन्मले तिळे!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आयव्हीएफ तंत्रज्ञानाने छत्रपती संभाजीनगरात चक्‍क तिळ्यांनी जन्म घेतला आहे. मातेसह तिन्ही बाळांची प्रकृती ठणठणीत आहे. ही कुतूहलजनक प्रसुती घडली ती शहरातील मातृका वुमेन्स हॉस्पीटल आणि आयव्हीएफ सेंटरमध्ये. महिलेची साडेआठ महिन्यांतच प्रसुती करण्यात आली आहे. यात तिन्ही बाळ मुले असून तिळ्यांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कन्नड येथील उजमा अफरोज पठाण […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आयव्हीएफ तंत्रज्ञानाने छत्रपती संभाजीनगरात चक्‍क तिळ्यांनी जन्म घेतला आहे. मातेसह तिन्ही बाळांची प्रकृती ठणठणीत आहे. ही कुतूहलजनक प्रसुती घडली ती शहरातील मातृका वुमेन्स हॉस्पीटल आणि आयव्हीएफ सेंटरमध्ये.

महिलेची साडेआठ महिन्यांतच प्रसुती करण्यात आली आहे. यात तिन्ही बाळ मुले असून तिळ्यांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कन्नड येथील उजमा अफरोज पठाण या महिलेला ॲनेमिया व उच्च रक्तदाबाचा त्रास होता. औषधी घेतल्यानंतरही रक्तदाब कमी होत नव्हता. यासह अन्य त्रास असल्याने पठाण यांची आपत्कालीन प्रसुती करण्यात आली. तिन्ही बाळांचे वजन हे २१००,१४००,१२५० ग्रॅम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यात डॉ. धनश्री अनुप चलवदे (स्त्री रोग तज्ञ), डॉ. जुही राहुल गोसावी (स्त्री रोग तज्ञ), डॉ. स्नेहा मानधने (भूलतज्ञ ), डॉ.राहुल गोसावी (नवजात शिशू तज्ञ) व डॉ. फय्याज शहा आणि मातृका वुमेन्स हॉस्पिटलची संपूर्ण टीम होती. पठाण यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टर व हॉस्पिटलचे आभार मानले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software