- News
- एंटरटेनमेंट
- शुभांगी अत्रे म्हणाली, मला बोल्ड सीन करायला हरकत नाही, पण…
शुभांगी अत्रे म्हणाली, मला बोल्ड सीन करायला हरकत नाही, पण…
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
भाभी जी घर पर हैं… मध्ये अंगूरी भाभीच्या भूमिकेत सर्वांचे मनोरंजन करणाऱ्या शुभांगी अत्रेला आता ओटीटीवर काम करायचे आहे. त्यामध्ये बोल्ड सीन्स करण्यास आपला कोणताही आक्षेप नसल्याचे तिने म्हटले आहे. फक्त ते कलात्मकरित्या शूट केले गेले पाहिजेत असे तिला वाटते. अनेक दिवसांपासून छोट्या पडद्यावर अंगूरी भाभीच्या भूमिकेतून लोकांना हसवणारी शुभांगी केवळ एक उत्तम अभिनेत्रीच नाही […]
भाभी जी घर पर हैं… मध्ये अंगूरी भाभीच्या भूमिकेत सर्वांचे मनोरंजन करणाऱ्या शुभांगी अत्रेला आता ओटीटीवर काम करायचे आहे. त्यामध्ये बोल्ड सीन्स करण्यास आपला कोणताही आक्षेप नसल्याचे तिने म्हटले आहे. फक्त ते कलात्मकरित्या शूट केले गेले पाहिजेत असे तिला वाटते.


शुभांगी म्हणाली, की ओटीटी दाखवत असलेला समाजाचा दृष्टीकोन इतर कोणतेही व्यासपीठ दाखवत नाही. कधीकधी प्रेक्षकांसमोर एक नवीन दृष्टीकोन मांडावा लागतो, जो त्यांना जीवनातील वास्तव दाखवतो. मी अशी गोष्ट कोणत्याही वेब सीरिजमध्ये पाहिली नाही, जिथे कोणी गंभीर चुकीचे काम करते आणि नंतर ते सुधारते. ओटीटीचे प्रेक्षक शहरी आहेत आणि त्यांना ही सामग्री प्रासंगिक वाटते.
दिल्ली क्राइम आणि लिटिल थिंग्ज आवडते शो…
शुभांगी म्हणाली, हा बदलाचा काळ आहे आणि आपण ते स्वीकारले पाहिजे. तिच्या आवडत्या वेब सिरीजबद्दल शुभांगी म्हणाली, दिल्ली क्राइम आणि लिटिल थिंग्ज हे माझे आवडते शो आहेत. दिल्ली क्राईममधील शेफाली शाहच्या अभिनयाने मी खूप प्रभावित झाले आणि आयुष्यातील लहान-लहान आनंद साजरे करण्याची तिची भावना मला खूपच आवडली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
Latest News
15 Mar 2026 21:11:45
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...

