विशेष मुलाखत : न्याय करणे लोकांची सवय झाली आहे!; इमर्जन्सी चित्रपटावरून वाद निर्माण करणाऱ्यांना कंगणा राणावतने सुनावले

On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र

तंदुरी मुर्गी हू यार, गटका ले सैया अल्कोहल से… या असल्या फालतू गाण्यांतून आपण समाजाला काय सांगत आहोत?; भंसाळी असो की कुणी स्त्रीला कमी लेखणाऱ्यांना फटकारच, कोलकाता- बदलापूर घटनेवर झाली व्यक्त बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतसाठी हे वर्ष खूप खास आहे. तिचा इमर्जन्सी चित्रपट ६ सप्टेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. पण त्याआधी ती त्याचे प्रमोशन करतेय. […]

तंदुरी मुर्गी हू यार, गटका ले सैया अल्कोहल से… या असल्या फालतू गाण्यांतून आपण समाजाला काय सांगत आहोत?; भंसाळी असो की कुणी स्त्रीला कमी लेखणाऱ्यांना फटकारच, कोलकाता- बदलापूर घटनेवर झाली व्यक्त

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतसाठी हे वर्ष खूप खास आहे. तिचा इमर्जन्सी चित्रपट ६ सप्टेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. पण त्याआधी ती त्याचे प्रमोशन करतेय. कंगणाने विशेष मुलाखतीत अक्षय कुमार आणि रणबीर कपूरबद्दल मत व्यक्त केले. कंगना किती टॅलेंटेड आहे हे सर्वांनाच माहीत आहे, पण त्याचवेळी ती तितकीच स्पष्टवक्ती आणि बोल्ड आहे. मग तो अभिनय असो वा दिग्दर्शन किंवा मत व्यक्त करणे… तिने नेहमीच काहीच हातचे राखलेले नाही. लोक तिला कॉन्ट्रोव्हर्शियल क्वीन म्हणूनही ओळखतात, पण ती स्वतःच्या अटींवर जगते. अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळालेली ही अभिनेत्री सध्या तिच्या ‘इमर्जन्सी’ या नव्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिच्याशी ही खास बातचित…

प्रश्न : तुला अभिनयासाठी चार-चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. तुझे राजकीय करिअर किंवा आनंदाच्या अनेक घटना तुझ्या आयुष्यात घडल्या आहेत. पण कारकिर्दीतील सर्वात कठीण टप्पा कोणता होता?
कंगणा :
मला वाटते की सुरुवातीची वर्षे माझ्यासाठी खूप कठीण होती. खासकरून जेव्हा मी गँगस्टर आणि वो लम्हे चित्रपट केले होते. त्यानंतर मला काम मिळाले नाही. फॅशनही झाली, अधूनमधून छोट्या मोठ्या भूमिका मिळत होत्या. पण नंतर लगेच काम मिळणे बंद होत होते. दोन वर्षांचा काळ असा होता की माझ्याकडे काम नव्हते. मी अगदी लहान होते. मनात विचार आला की मी कॉलेजचा अभ्यास पूर्ण करू का? असे ना होवो की मी इकडचीही राहणार नाही आणि तिकडचीही नाही. माझ्यासारखी मुलगी जी एवढ्या छोट्या गावातून येते, जिला इंग्रजी येत नाही, जिला कोणतेही प्रमाणपत्र नाही आणि ती या इंडस्ट्रीत तिची जागा शोधत असते, तेव्हा तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता. तो काळ वर्षानुवर्षे चालू राहिला.

अखेर मी ठरवले की अभिनयात काही होत नसेल तर चित्रपट दिग्दर्शित करू. मी वयाच्या २३ व्या वर्षी माझा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला होता. मग छोट्या छोट्या भूमिका करून काही पैसे कमावले, मग मी अमेरिकेला गेले. मी तिथे पटकथा लेखनाचे काम केले. अभिनयात आपले काही होणार नाही याची शंभर टक्के खात्री वाटत होती. त्याकाळी टिपिकल चित्रपट बनवले जायचे, जे मला आवडायचेही नाहीत. मग मी कॅलिफोर्नियामध्ये माझी एक शॉर्ट फिल्म बनवली. तिथे एका एजन्सीने मला फिल्ममेकर म्हणून कामावर घेतले. मी जेव्हा तिथे काम करत होते तेव्हा माझ्या कारकिर्दीत ७-८ वर्षांचा संघर्षाचा दीर्घ काळ होता. फोटोग्राफी, दिग्दर्शन, स्क्रिप्ट लिहिणे शिकत होते. पैसे कमावण्यासाठी मी आणखी एक चित्रपट केला, क्वीन. हा चित्रपट चांगला चालला. पण तोपर्यंत मी त्या प्रवासात पुढे गेले होते. तोपर्यंत मला दिग्दर्शनाची आवड लागली होती.

आता जेव्हा मी इमर्जन्सी हा चित्रपट केला तेव्हा मला हायसे वाटले. माझा एका गोष्टीवर विश्वास आहे, जेव्हा आपल्याला वाटते की आपल्याबाबतीत वाईट घडत आहे. तेव्हा त्या वाईटाच्या मागे नक्कीच काहीतरी चांगले असते. आजच्या पिढीतल्या लोकांना वाटतं की आजच सगळं मिळायला हवं. तुम्ही तुमचे काम करा. आजच्या पिढीला आधी रिझल्ट हवे आहेत, मग त्यांनी काम केलेले असो किंवा नाही. असा विचार मनात ठेवला असता तर आयुष्यात मी कधीच इथपर्यंत पोहोचू शकले नसते. माणसाने कधीही उदास होऊ नये. अभिनय येत नसेल तर दिग्दर्शन करेन असं मला वाटायचं. तसेही नाही तर मी फोटोग्राफी करेन. अहो, बाकी काही नाही तर मी मजूर म्हणून काम करेन. मात्र मला हे हवे आहे, मला ते हवे आहे, रोज काही जण केवळ यादी तयार करत असतात, ही लोकांची वृत्ती वाईट आहे.

एक निर्धारी मुलगी असण्याबरोबरच तुला बंडखोरही म्हणतात, मग तुझ्या आयुष्यात ते परिवर्तन कधी आले?
कंगणा :
परिवर्तन असे काही नव्हते. मी लहानपणापासून अशीच आहे. जेव्हा माझा गँगस्टर चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मला शबाना आझमी यांचा फोन आला. जावेद साहब (अख्तर) माझ्याशी १५ मिनिटे बोलले. ते म्हणाले की, एवढी चांगली कलाकार मी कधीच पाहिली नाही आणि तीही इतक्या लहान वयात. एकीकडे लोक तुमची स्तुती करतात आणि दुसरीकडे वर्षानुवर्षे तुम्हाला काम मिळत नाही अशावेळी माझ्या जागी दुसरे कोणी असते तर डिप्रेशनमध्ये गेले असते. पण मी ती परिस्थिती स्वीकारली. हे घडत नाही. माझ्यासाठी जे चांगले होईल ते मी करेन, असे मी ठरवले.

तुझ्या “इमर्जन्सी’ चित्रपटाविषयी बोलू, इंदिरा गांधींच्या जीवनातील हा काळ टिपण्यासाठी तुला कोणत्या गोष्टीने प्रेरित केले?
कंगणा :
आणीबाणीवर चित्रपट बनवायचा म्हणून मी बनवलेला नाही. एक प्रकारे आणीबाणीला कर्फ्यू समजा. ज्यामध्ये काहीच घडले नाही त्यावर चित्रपट कसा बनवणार? त्यामुळेच त्यावर आजवर चित्रपट बनला नाही. त्यामुळे माझी त्यात आवड निर्माण झाली. मी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे चरित्र वाचले, ज्यात त्यांच्या गुरूंनी म्हटले होते, हे संपवा, ही चांगली गोष्ट नाही. यामुळे देश तुरुंग बनला आहे. यावर उत्तर देताना इंदिरा गांधींनी जे सांगितले तो त्यांचा प्रामाणिकपणा मला भावला. त्या म्हणाल्या, मी एका भयंकर राक्षसावर स्वार आहे आणि आता जर मी त्यावरून उतरले तर तो मला खाईल. आणीबाणीची कारणे काय होती? त्याचा आफ्टर इफेक्ट काय होता, या सर्व गोष्टींचा समावेश या चित्रपटात केला आहे. आणीबाणी हा चित्रपटाचा मध्यवर्ती मुद्दा आहे. इंदिरा गांधींच्या गूढतेने मला खूप प्रेरणा दिली.

प्रश्न : सोनेरी पैलूही दाखवता आले असते, असे इर्मजन्सीचे समर्थक सांगतात. चित्रपटात वाईट बाबीच दाखवल्यात का?
कंगणा
: तुम्ही एखाद्याला नकारात्मक तेव्हाच बनवू शकता जेव्हा तो सकारात्मक असेल. आणीबाणी हा एक महत्त्वाचा चित्रपट आहे. कारण हा चित्रपट दाखवतो की इंदिरा गांधींसारख्या तुम्ही कितीही महान नेत्या असलात तरी गर्व कधीच कुणाची साथ सोडत नाही. तो कुणाचीही शिकार करू शकतो. या चित्रपटातून मला खूप काही शिकायला मिळाले. यात श्रीमती गांधींच्या चांगल्या बाजू दाखवल्या जात नाहीत असा लोकांचा कयास का आहे ते कळत नाही. न्याय करणे ही लोकांची सवय आहे. मला वाटतं, लोकांनी चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहावी.

प्रश्न : तू म्हणालीस की तू कधीही कोणत्याही कपूर किंवा खानचा आधार घेतला नाहीस. त्या भूमिका नाकारायलाही हिंमतही लागतेच की…
कंगणा
: जेव्हा मी थोडी यशस्वी झालो तेव्हा ती मानसिकता माझ्यात आली. ८-९ वर्षांच्या संघर्षानंतर आपण सक्षम असल्याची जाणीव झाली. जेव्हा सलमानने मला बजरंगी भाईजानमध्ये रोल ऑफर केला तेव्हा मी त्याला म्हणाले, आता क्विनच्या डबल रोलनंतर तू मला अशी भूमिका देशील का? त्याने सुलतान चित्रपटात भूमिका देण्यासाठी मला बोलावले, तेव्हा मी त्याला नकार दिला. तो हसला आणि म्हणाला, आता तुला अजून काय हवंय? सलमान माझा मित्र आहे. एकदा रणबीर कपूर माझ्या घरी आला. तो म्हणाला, संजू चित्रपटासाठी मी राजकुमार हिरानी यांच्याशी बोललो आहे. मी म्हणाले, मला नको आहे. तो म्हणाला, तुला माझ्यासोबत चित्रपट करायचा नाही? मी म्हणाले, तुम्ही गैरसमज करत आहात. इंडस्ट्रीतील अनेक लोक माझे शत्रू झाले होते. त्यामुळे मी हे माझ्यासाठी करत नव्हते. अक्षय कुमारने मला सिंग इज ब्लिंगची ऑफर दिली होती. त्यानंतर मी आणखी एक-दोन चित्रपट केले, पण मी ते केले नाही, म्हणून तो म्हणाला, कंगना, तुला माझ्यासोबत समस्या आहे का? मी म्हणाले, सर मला काही अडचण नाही. तर ते म्हणाले, मग काय? मी म्हणाले, स्त्रीलाही प्रतिष्ठा असते. तुलाही मुलगी आहे. कृपया समजून घ्या. मी माझे संबंध खराब केले. अर्थात सर्वच असे नसतात. सलमान माझा मित्र आहे. त्याला वाईट वाटत नाही. बरेच लोक माझे नकारात्मक चित्रण करतात, मला वाईटही वाटते, परंतु यामुळे माझे वैयक्तिक नुकसानच झालेले आहे.

प्रश्न : आता तुम्ही सत्तेत आहात. आधी कोलकात्याची भीषण घटना आणि नंतर बदलापूरची घटना, काय व्हायला हवं असं वाटतं?
कंगणा :
या घटना ऐकवल्यावर, त्यावर विचार करताना मी सुन्न होते. एक मुलगी सार्वजनिक सेवेत कामाला जाते, शिकायला जाते आणि तिच्यासोबत असे काही घडते तेव्हा माणुसकीचा आत्माही हादरतो. अशा भयंकर घटना देशात प्रत्येक स्तरावर घडतात. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण केले होते आणि ते म्हणाले होते, “जेव्हा मुली घरातून बाहेर पडतात, तेव्हा दहा प्रश्न विचारले जातात: तू कुठे जात आहे? किती वाजता येणार? कोणाला भेटणार?… हे प्रश्न तुम्ही तुमच्या मुलींनाच नव्हे तर मुलांनाही विचारले पाहिजेत. मुले कोणाला भेटत आहेत, त्यांची कोणाशी मैत्री आहे, ते कोणता कंटेंट पाहत आहेत, कोणत्या गोष्टीत सामील आहेत, ते नशा करता का हे सगळे दुर्लक्षित केले जाते आणि मग वेळ हातातून निघून जाते.

मुलीने शॉर्ट्‌स किंवा डीप नेक परिधान केले की सगळ्या गल्लीला कळते. ते आपले कल्चर, सोसायटी आहे. कलाक्षेत्रातील लोकही बेफिकीरपणे कंटेंट बनवतात. मला संजय लीला भंसाली यांनी रामलीलाकरिता आयटम साँग करायला बोलावले होते. मी त्याला स्पष्ट सांगितले, की मी हे करू शकत नाही. मग तो भंसाली असो की आणखी कुणी. मला अनेकांनी म्हटलं की, ती वेडी आहे, जी भन्साळींना नकार देत आहे. आपण स्त्रीला कसे चित्रित करतो हे खूप महत्वाचे आहे. मी १० वर्षांपूर्वी आमिर खानसोबत सत्यमेव जयतेचा एक महत्त्वाचा भाग केला होता. मी तेव्हाही तेच बोलत होते आणि आजही तेच बोलते. तंदुरी मुर्गी हू यार, गटका ले सैया अल्कोहल से… या असल्या फालतू गाण्यांतून आपण समाजाला काय सांगत आहोत?

ज्या प्रकारचे पुरुषप्रधान चित्रपट बॉक्स ऑफिसवर अराजक माजवतात, ते कुठून येत असतील असा प्रश्न पडतो? टाळ्या, शिट्ट्या, मुलं कुऱ्हाडी आणि बंदुका घेऊन शाळेत जात आहेत आणि त्यांना कोणी काही बोलत नाही किंवा थांबवत नाही. जणू काही पोलीसच नाहीत. कायदा आणि सुव्यवस्था सर्वच मृत झाली आहे. मृतदेहांचे ढीग पडले आहेत. का? मजा! ते ना कोणाचे भले आहे ना लोककल्याणाचे. फक्त मजा आणि लोक ते पाहण्यासाठी बाहेर येतात. पब्लिक सुद्धा बघा, अशा समाजाला काय म्हणायचे? ही चिंतेची बाब आहे. अशा चित्रपटांचा निषेध व्हायला हवा. अशा लोकांना जी दाद मिळते त्याला माध्यमांचीही जबाबदारी असते. त्याचा निषेध केला पाहिजे, टीका केली पाहिजे, असे परखडपणे कंगणा म्हणाली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विद्यापीठात केमिकल टेक्नॉलॉजी विभागात स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी

Latest News

विद्यापीठात केमिकल टेक्नॉलॉजी विभागात स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी विद्यापीठात केमिकल टेक्नॉलॉजी विभागात स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील केमिकल टेक्नॉलॉजी विभागात एम. फार्मसी अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांसाठी...
आयआरसीटीसीच्या कन्फर्म तिकिटात नाव बदलायचे कसे?
सकाळ होईपर्यंत झोप येत नाही, कूस बदलत राहता? आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं, देसी टॉनिक, येईल सुखाची झोप!
Beauty Feature : फिल्टरसारखा लूक तेही मेकअपमधून!; जाणून घ्या ब्लरिंग मेकअप, लग्नाच्या सिझनमध्ये खूप येईल कामी!!
नशेखोराचा कहर : आधी लिफ्ट मागितली, नंतर रस्‍त्‍यात गाडी थांबवून दारू पिण्यासाठी पैसे मागत १८ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण, मनपा आयुक्‍तांच्या निवासस्थानाजवळील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software