‘पठाण’नंतर सिद्धार्थ आनंद शाहरुख-सुहानाला घेऊन बनवतोय ‘किंग’

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा सिद्धार्थ आनंद त्याच्या पुढच्या चित्रपटात पुन्हा एकदा शाहरुखसोबत काम करणार आहे. २०२३ मध्ये, शाहरुख खानने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचणारा YRF स्पाय युनिव्हर्स चित्रपट ‘पठाण’मध्ये पहिल्यांदाच दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदसोबत काम केले. पठाणच्या २ वर्षांनंतर शाहरुख खान आणि सिद्धार्थ आनंद आता ‘किंग’च्या तयारीत व्यस्त आहेत. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, शाहरुख खान आणि सिद्धार्थ […]

शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा सिद्धार्थ आनंद त्याच्या पुढच्या चित्रपटात पुन्हा एकदा शाहरुखसोबत काम करणार आहे. २०२३ मध्ये, शाहरुख खानने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचणारा YRF स्पाय युनिव्हर्स चित्रपट ‘पठाण’मध्ये पहिल्यांदाच दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदसोबत काम केले. पठाणच्या २ वर्षांनंतर शाहरुख खान आणि सिद्धार्थ आनंद आता ‘किंग’च्या तयारीत व्यस्त आहेत.

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, शाहरुख खान आणि सिद्धार्थ आनंद ही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठी जोडी बनली आहे आणि ते पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर जादू करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या ॲक्शनपटाची तयारी गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. मार्च २०२५ मध्ये किंग रिलीज होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी सुजॉय घोष या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याचे बोलले जात होते आणि ही माहिती ‘किंग’चे संवाद लिहिणारे अब्बास टायरवाला यांनी दिली. ‘किंग’मध्ये शाहरुख खान मुख्य भूमिकेत आहे, तर सुहाना खान देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. किंगच्या स्क्रिप्टमधील प्रत्येक अभिनेत्याचे पात्र उत्तम असल्याचे सांगण्यात येत आहे. सिद्धार्थ आनंद, सुरेश नायर आणि सागर पंड्या यांच्यासह सुजॉय घोष यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे. या चित्रपटासाठी जगभरात ॲक्शन सीन शूट करण्याची योजना आखली जात असल्याची माहिती आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software