२ लाखांसाठी इतके छळले, की २२ वर्षांच्या राधाने शेततळ्यात उडी घेऊन केली आत्‍महत्‍या, पैठण तालुक्‍यातील खळबळजनक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : माहेरी कमालीची गरिबी. पण अवघ्या दोन लाखांसाठी सासरच्यांनी तीन वर्षांपासून अतोनात छळ मांडला. अखेर सहनशक्ती संपल्याने राधा संतोष शेळके या २२ वर्षीय तरुणीने शेततळ्यात उडी मारून जीव दिला. पैठण तालुक्यातील नांदर येथे सोमवारी (६ ऑक्‍टोबर) दुपारी ३ वाजता ही दुर्दैवी घटना घडली.

राधाचा (रा. सुंदरवाडी, झाल्टा फाटा, छत्रपती संभाजीनगर) विवाह नांदर येथील संतोष शेळके याच्यासोबत झाला होता. त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी जुळी मुलेही आहेत. लग्नानंतर लगेच तिच्या सासरच्यांनी घर बांधणीसाठी २ लाख रुपये माहेरहून आणावेत यासाठी शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. दीर राजेंद्र, सासू कलाबाई, जाऊ निकिता, नणंद जनाबाई अमोल रोठे (रा. नारायणगाव, जि. बीड) ही सातत्याने राधाला छळत होते. त्याला कंटाळून अखेर सोमवारी राधाने गावातील शेततळ्यात उडी घेत जीव दिला.

पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार
घटनेची माहिती मिळाल्यानंतर राधाच्या माहेरच्यांनी तिचा मृतदेह पैठणच्या शासकीय रुग्णालयात नेला. तेथे माहेरच्यांनी आरोपींच्या अटकेपर्यंत शवविच्छेदन आणि अंत्यसंस्कार न होऊ देण्याची भूमिका घेतली. यामुळे तनावाची परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर पाचोड पोलीस ठाण्याचे फौजदार गोविंद राऊत यांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यावर नातेवाइकांनी शवविच्छेदनास परवानगी दिली. यानंतर राधाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नांदर येथे नेण्यात आला. मात्र, तेथेही नातेवाइकांनी आरोपींच्या अटकेची मागणी करीत अंत्यसंस्कार रोखले. अखेर पोलिसांनी समजूत काढल्यावर राधावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software