११ वर्षीय मुलीचा डेंग्‍यूसदृश आजाराने मृत्‍यू, सिल्लोडमधील घटनेने खळबळ

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : चिंचखेडा (ता. सिल्लोड) येथील ११ वर्षीय दीपाली अंबादास वाणी या शाळकरी मुलीचा डेंग्‍यूसदृश आजाराने उपचारादरम्यान बुधवारी (७ ऑगस्ट) मध्यरात्री छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. दीपाली माणिकनगर येथील सिद्धेश्वर हायस्कूलमध्ये पाचवीत शिकत होती. शनिवारी (३ ऑगस्ट) शाळेत गेली असता तिला अस्वस्थ वाटू लागले. तिला लगेच घरी पाठविण्यात आले. तिच्या वडिलांनी […]

सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : चिंचखेडा (ता. सिल्लोड) येथील ११ वर्षीय दीपाली अंबादास वाणी या शाळकरी मुलीचा डेंग्‍यूसदृश आजाराने उपचारादरम्यान बुधवारी (७ ऑगस्ट) मध्यरात्री छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

दीपाली माणिकनगर येथील सिद्धेश्वर हायस्कूलमध्ये पाचवीत शिकत होती. शनिवारी (३ ऑगस्ट) शाळेत गेली असता तिला अस्वस्थ वाटू लागले. तिला लगेच घरी पाठविण्यात आले. तिच्या वडिलांनी सिल्लोडच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. चार दिवस उपचार घेतल्यानंतरही प्रकृती खालावल्याने तिला मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात आणण्यात आले.

मात्र उपचारादरम्यान बुधवारी रात्री तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तालुका आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नासेर खान पठाण, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांच्यासह आरोग्य पथक चिंचखेडा येथे दाखल झाले. पथकाने गावात सर्वेक्षण करून ग्रामस्थांना उपाययोजना सांगितल्या.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software