- News
- जिल्हा न्यूज
- हर्षवर्धन जाधव यांच्यापेक्षा संजना जाधव दुप्पट श्रीमंत!, इतकी आहे ‘प्रॉपर्टी’
हर्षवर्धन जाधव यांच्यापेक्षा संजना जाधव दुप्पट श्रीमंत!, इतकी आहे ‘प्रॉपर्टी’
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
कन्नड (सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभा निवडणुकीच्या अनेक रोचक गोष्टी सध्या समोर येत आहेत. कन्नडमध्ये विभक्त पती-पत्नी आमनेसामने ठाकले आहेत. माजी आमदार हर्षवर्धन जाधव अपक्ष निवडणूक लढवत असून, त्यांच्या पत्नी संजना जाधव शिंदे गटाकडून उमेदवार आहेत. दोघांच्या राजकीय संघर्षाची कहानी सध्या राज्यभरात चर्चिली जात आहे. संजना जाधव यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रात त्यांची संपत्ती ४ […]
कन्नड (सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभा निवडणुकीच्या अनेक रोचक गोष्टी सध्या समोर येत आहेत. कन्नडमध्ये विभक्त पती-पत्नी आमनेसामने ठाकले आहेत. माजी आमदार हर्षवर्धन जाधव अपक्ष निवडणूक लढवत असून, त्यांच्या पत्नी संजना जाधव शिंदे गटाकडून उमेदवार आहेत. दोघांच्या राजकीय संघर्षाची कहानी सध्या राज्यभरात चर्चिली जात आहे. संजना जाधव यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रात त्यांची संपत्ती ४ कोटी १८ लाख १० हजार ३४९ रुपयांची असल्याचे म्हटले आहे. हर्षवर्धन जाधव यांच्या संपत्तीच्या तुलनेत ही संपत्ती जास्त आहेत. हर्षवर्धन जाधव यांच्याकडे २ कोटी ९४ लाख ३ हजार ९०७ रुपये मालमत्ता आहे.
अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्याकडे एकूण २ कोटी ९४ लाख ३ हजार ९०७ रुपये मालमत्ता आहे. यात ४२ लाख ३९ हजार ६०७ रुपयांची जंगम तर २ कोटी ५२ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता असून, एकूण २३ लाख ८८ हजार ७७९ रुपयांचे कर्ज आहे. २०२३ चे वार्षिक उत्पन्न ६ लाख ४६ हजार ५८० रुपये तर २०२४ चे वार्षिक उत्पन्न ९ लाख ८ हजार ४२७ रुपये आहे. जाधव यांच्याकडे १ लाख रुपये रोख रक्कम असून बँकेत १० लाख ६२ हजार ८९७ रुपयांच्या ठेवी आहेत. ३० लाख ७६ हजार ७१० रुपयांचे सोने त्यांच्याकडे आता दाखवले आहे. त्यांच्याकडे २ कोटी ५२ लाख रुपये किमतीची शेती असून, भारतीय स्टेट बँकेकडून ३ लाख ३८ हजार ७७९ रुपयांचे पर्सनल तर २० लाख ५० हजार रुपयांचे पंजाब नॅशनल बँकेकडून गोल्ड लोन घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध विविध पोलिस ठाण्यांत ८ गुन्हे सध्या दाखल असून ते न्यायप्रविष्ठ असल्याचे शपथपत्रात म्हटले आहे.
संजना जाधव यांच्या उमेदवारीबद्दल हर्षवर्धन जाधव म्हणाले, की आमच्या कुटुंबातील एका सदस्याला फोडून एका राजकीय पक्षाने तिकीट दिलं आहे. कुठेतरी या सगळ्या गोंधळामागे रावसाहेब दानवे आहेत. माझं घर फोडण्यात आलं. माझ्या विरोधात पत्नीला उभं करण्याचे काम केलं आहे. त्याचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो. सगळेजण आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करत आहेत. माझ्याकडे दिवाळी साजरी करण्यासाठी कोणीचं उरलेलं नाही. त्यामुळे आता हे धर्मयुद्ध असून ठोकून काढू, असे हर्षवर्धन जाधव म्हणाले. हर्षवर्धन आणि संजना जाधव दोघेही मराठा असून, कन्नड मतदारसंघात मराठा समाजाचे वर्चस्व आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाने उदयसिंह राजपूत यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
By City News Desk
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
By City News Desk
Latest News
11 Mar 2026 22:08:14
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...

