- News
- जिल्हा न्यूज
- हर्षवर्धन जाधव म्हणाले, चूक सुधारण्याची संधी द्या!; संजना जाधव म्हणाल्या, विश्वासाला तडा जाऊ देणार न...
हर्षवर्धन जाधव म्हणाले, चूक सुधारण्याची संधी द्या!; संजना जाधव म्हणाल्या, विश्वासाला तडा जाऊ देणार नाही!!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
कन्नड (सीएससीएन वृत्तसेवा) : कन्नडमध्ये तिरंगी लढतीची रंगत आतापासूनच वाढली आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे अपक्ष उमेदवार असून, त्यांच्या विभक्त पत्नी संजना जाधव या शिंदे गटाकडून रिंगणात आहेत. ठाकरे गटाचे उदयसिंह राजपूत यांनीही जोरबैठका लावल्या आहेत. पती-पत्नीतील ही लढाई राज्यभरात लक्षवेधी ठरली आहे. हर्षवर्धन जाधव यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सभा घेतली. यावेळी […]
कन्नड (सीएससीएन वृत्तसेवा) : कन्नडमध्ये तिरंगी लढतीची रंगत आतापासूनच वाढली आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे अपक्ष उमेदवार असून, त्यांच्या विभक्त पत्नी संजना जाधव या शिंदे गटाकडून रिंगणात आहेत. ठाकरे गटाचे उदयसिंह राजपूत यांनीही जोरबैठका लावल्या आहेत. पती-पत्नीतील ही लढाई राज्यभरात लक्षवेधी ठरली आहे. हर्षवर्धन जाधव यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सभा घेतली. यावेळी त्यांनी चुकीची कबुली देत एक संधी देण्याचे आवाहन केले. दुसरीकडे संजना जाधव यांनीही जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली.
माझ्याकडून चुका झाल्या. मी चुकलो मला माफ करा. मी जनतेच्या संपर्कात कमी पडलो. पण आता पुन्हा चूक होणार नसून चूक सुधारण्याची एक संधी द्या. मी तुमच्यासमोर नतमस्तक होतो. सर्व जाती-धर्मासाठी विकासाचे राजकारण करणार असल्याचे अपक्ष आमदार हर्षवर्धन जाधव म्हणाले. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पिशोर नाका ते शहरातील उरूस मैदानापर्यंत रॅली काढल्यानंतर त्यांनी सभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी माजी आमदार तेजस्विनी जाधव यांच्यासह हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी हर्षवर्धन जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार, रावसाहेब दानवे, आमदार उदयसिंह राजपूत यांच्यावर टीका केली.
संजना जाधव यांनी शक्तीप्रदर्शन करत मंगळवारी उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पिशोर नाका ते हिवरखेडा रोड गिरणी मैदानापर्यंत रॅली काढत जाहीर सभा पार पडली. सभेत बोलताना संजना जाधव म्हणाल्या की, राज्यात महायुती सरकारने महिला, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या. राज्यात अशी विकासकामे करणाऱ्या सरकारच्या पाठीशी जनतेने उभे राहिले पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आल्यावर विश्वास टाकून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी आता वाढली आहे. मी जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे त्या म्हणाल्या. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, संजय केनेकर, तालुकाध्यक्ष किशोर पवार, विजय औताडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
By City News Desk
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
By City News Desk
Latest News
11 Mar 2026 22:08:14
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...

