सोयगावच्या वाडीत शेतकऱ्याची, फुलंब्रीत तरुणाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सोयगाव/ फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : नापिकी व कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन जितेंद्र नेहरू गव्हाणे (वय ३२) या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना वाडी (ता. सोयगाव) येथे मंगळवारी (२३ जुलै) सकाळी सातला घडली. जितेंद्र गव्हाणे यांना चार एकर जमीन आहे. २ वर्षांपासून कमी पाऊस पडत नसल्याने शेतीतून समाधानकारक उत्पन्‍न होत नव्हते. रोजगार हमी योजनेतून मंजूर झालेल्या सिंचन […]

सोयगाव/ फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : नापिकी व कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन जितेंद्र नेहरू गव्हाणे (वय ३२) या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना वाडी (ता. सोयगाव) येथे मंगळवारी (२३ जुलै) सकाळी सातला घडली.

जितेंद्र गव्हाणे यांना चार एकर जमीन आहे. २ वर्षांपासून कमी पाऊस पडत नसल्याने शेतीतून समाधानकारक उत्पन्‍न होत नव्हते. रोजगार हमी योजनेतून मंजूर झालेल्या सिंचन विहिरीचेही अनुदान न आल्याने त्यांनी खासगी सावकाराकडून कर्ज काढून ५० फूट विहिरीचे खोदकाम केले. त्‍यातही दुर्दैवाने विहिरीला पाणी लागले नाही. यामुळे आता बँक, मित्रमंडळी, पतसंस्था, सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची, याची चिंता त्यांना होती. याच नैराश्यातून त्यांनी धारकुंड खोरा शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची नोंद बनोटी दूरक्षेत्राने केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई, वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे.

युवकाने घरासमोरच झाडाला घेतला गळफास, फुलंब्रीची घटना
३७ वर्षीय तरुणाने घरासमोरच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (२३ जुलै) दुपारी तीनच्या सुमारास फुलंब्री शहरातील वाघमारे वस्तीवर घडली. राम बंडू दाभाडे (वय ३७) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेची नोंद फुलंब्री पोलिसांनी घेतली आहे. महात्मा फुले रुग्णवाहिका चालक विजय देवमाळी यांनी राम बंडू दाभाडे यांना तात्काळ फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software